ह्युमन राईट मिरर
Monday, 22 Apr 2019

युवा संस्कार व्याख्यानमाला” १८ फेब्रुवारीपासून..

आजचा युवक जर सद्विचारांचा आणि कर्तुत्ववान व्हायचा असेल तर योग्य संस्कारांची गरज आहे. या सामाजिक जाणिवेचे भान ठेवून कोल्हापुरातील कै.श्रीमती प्रभावतीबेन मणियार चैरिटेबल ट्रस्ट आणि प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या ” ज्ञानरंग” चे संयुक्त विद्यमाने दिनांक १८ ते २२ फेब्रुवारी २०१९ या कालावधीमध्ये आठवी ते बारावीतील विद्यार्थ्यां साठी गायन समाज देवल क्लब येथे सायंकाळी ५:३० ते ७ या वेळेत व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. दि.१८ रोजी श्री.शेखर फडणीस यांच्या “शिक्षण आणि संस्कार” या विषयाने वरील व्याख्यानमालेस प्रारंभ होईल. त्यानंतर सलग चार दिवस दि.१९ रोजी श्री. सुरेश महाजन (इचलकरंजी) हे “व्यक्तिमत्व विकास, विविध तंत्रे”,२० रोजी डॉ. सुरज चौगुले (इस्लामपूर) हे “आजचा विद्यार्थी, दशा आणि दिशा”, २१ रोजी सौ. नीलम माणगावे (जयसिंगपूर) हे “लेखन, वाचन आणि मुले”, आणि २२ रोजी श्री.चंद्रकांत निकाडे (आळते) यांच्या “विद्यार्थी दशेतील समायोजन” या विषयाने व्याख्यानमालेचा समारोप होईल.
ही व्याख्यानमाला व्यक्तिमत्व विकास, शिक्षणाबरोबरच संस्कार,संवाद कौशल्य, तंत्रज्ञानाचा योग्य वापर इत्यादी विषयांवर आधारित असून युवकांचे भविष्य उज्वल होण्या साठी याचा उपयोग व्हावा या हेतूने याचे आयोजीत करण्यात आली आहे. सदर व्याख्यानमाला सर्वांसाठी निशुल्क असून सर्व पालक, विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.आशा मणियार आणि प्रशांत जोशी यांचे वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *