युवासेनेच्या आरोग्य शिबिरात पाच हजार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी  

कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बराचसा भाग जलमय झाला होता. सध्यस्थितीत महापुराचे पाणी ओसरले असले तरी अस्वच्छतेमुळे साथीचे रोग फैलावण्याची दाट शक्यता आहे. याची पूर्व उपाययोजना म्हणून शिवसेना व युवासेनेतर्फे ठिकठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने आज शहरातील विविध कॉलेजवर आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे पाच हजारच्या वर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधे वाटप करण्यात आलीत.
           कोल्हापूर शहरात सुमारे वीस कॉलेज आहेत. यामध्ये हजारोंच्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत असून, झालेल्या महाप्रलयानंतर साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता आहे. याची खबरदारी म्हणून शहरातील प्रमुख कॉलेजवर युवा सेनेच्या वतीने आरोग्य शिबीरांचे आयोजन केले गेले. दोन दिवसांपूर्वी युवा सेना अध्यक्ष मा.आदित्यजी ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांच्या आदेशाने, *राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते मा.ऋतुराज क्षीरसागर व पुष्कराज क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आरोग्य अभियान युवासेनेच्या शहरातील विविध कॉलेजवर राबविण्यात आले. याकरिता युवा सेना अध्यक्ष मा.आदित्यजी ठाकरे यांनी खास ठाणे हून ५० डॉक्टरांचे पथक कोल्हापुरात पाठविले होते. या डॉक्टरांची तीन पथके तयार करण्यात आली होती, सकाळी ९ ते दुपारी ५ या वेळेत वेगवेगळ्या कॉलेजवर या पथकांवरे तपासणी करून आवश्यक औषधे मोफत देण्यात आली.
           या आरोग्य शिबिरांमध्ये सौ. स.म.लोहिया ज्युनिअर कॉलेज, पद्माराजे ज्युनिअर कॉलेज, डी.डी.शिंदे सरकार कॉलेज, विद्यापीठ ज्युनिअर कॉलेज, मेन राजाराम ज्युनिअर कॉलेज, कमला कॉलेज, न्यू कॉलेज, महाराष्ट्र ज्युनिअर कॉलेज, विवेकानंद कॉलेज, न्यू मॉडेल ज्युनिअर कॉलेज, कॉमर्स कॉलेज, राजाराम कॉलेज, शहाजी कॉलेज, गोखले कॉलेज या कॉलेजवर मिळून सुमारे पाच हजारच्या वर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
           या आरोग्य शिबिरांच्या आयोजनामध्ये आरोग्य मंत्री नामदार श्री.एकनाथ शिंदे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ठाणे जिल्हा डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.जे.डी.भोर, प्रभारी शिक्षण उपसंचालक श्री. लोहार यांच्यासह सर्वच कॉलेजमधील प्राचार्य व शिक्षकांचे सहकार्य लाभले.
यावेळी युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, युवा सेनेचे जिल्हा चिटणीस अविनाश कामते, युवा सेना शहरप्रमुख पियुष चव्हाण, विश्वदीप साळोखे, आयटीसेनेचे सौरभ कुलकर्णी, कपिल सरनाईक, विनय क्षीरसागर, अजिंक्य पाटील, शिवतेज सावंत, विनायक नलवडे, साहिल मुल्लाणी, विनायक मंडलिक, विनायक नलवडे, शुभम सावंत, शुभम घोरपडे, अरविंद कोळी, दादू शिंदे, वरूण मोरे, अक्षय पाटील, अक्षय कुंभार, अभिजित गोयानी, अजिंक्य शिद्रूक आदी युवा सैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!