युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

[शहरातील बापट कॅम्प परिसरास भेट व पूरग्रस्तांना मदतीचे वाटप तर सीपीआर मधील पूरग्रस्त रुग्णांच्या विभागास देणार भेट : आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती]

कोल्हापूर /प्रतिनिधी
शिवसेना नेते व युवा सेनेचे अध्यक्ष आदित्यजी ठाकरे दोन दिवसांच्या पूरग्रस्त भागाच्या पाहणी करीता कोल्हापूर व सांगली दौऱ्यावर येत असून, कोल्हापूर जिल्ह्यावर कोसळलेल्या अस्मानी संकटातून पूरग्रस्त नागरिकांना सावरण्यासाठी शिवसेना बचाव कार्यापासून मदत कार्यात अग्रेसर असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने शिवसहाय्य योजनेतून मदतकार्याचा ओघ सुरु आहे. या अनुषंगाने पाहणी करण्याकरिता आणि पूरग्रस्त नागरिकांना भेटून धीर देण्याकरिता शिवसेना नेते युवा सेना अध्यक्ष मा.आदित्यजी ठाकरे उद्या दि. २० ऑगस्ट रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्या दरम्यान ते शहरातील शहरातील बापट कॅम्प परिसरास भेट व पूरग्रस्तांना मदतीचे वाटप तर सीपीआर मधील पूरग्रस्त रुग्णांच्या विभागास देणार भेट असल्याची माहिती राज्य नियोजन विभागाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
शिवसेना नेते व युवा सेनेचे अध्यक्ष मा. आदित्यजी ठाकरे यांचे आज रात्री कोल्हापुरात आगमन होणार आहे. ते उद्या सकाळी १०.३० वाजता कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील बापट कॅम्प येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करणार आहेत. यानंतर सकाळी ११.३० वाजता सीपीआर रुग्णालय येथील पूरबाधित रुग्णांच्या विभागास भेट देवून उपचाराची माहिती घेत रुग्णांची विचारपूस करणार आहेत. यानंतर कोल्हापूर करवीर विधानसभा मतदारसंघातील चिखली व आंबेवाडी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी व नागरिकांना साहित्याचे वाटप, हातकणगले विधानसभा मतदारसंघातील पूरग्रस्त भागाची पाहणी व नागरिकांना साहित्याचे वाटप, कोल्हापूर शिरोळ विधानसभा मतदारसंघातील पूरग्रस्त भागाची पाहणी व नागरिकांना साहित्याचे वाटप आदी कार्यक्रम करून ते सायंकाळी सांगली कडे रवाना होणार आहेत, अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!