यामाहा ने कोल्हापूर येथे आपल्या ४१ व्या ट्रेनिंग स्कूलचे केले उद्घाटन

महाराष्ट्र: इंडिया यामाहा मोटर ने गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, युनिव्हर्सिटी रोड, विद्यानगर, कोल्हापूर येथे आज आपल्या ४१ व्या ट्रेनिंग स्कूलच्या उद्घाटनाची घोषणा केली आहे. यामाहा आणि गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘सेंटर ऑफ एक्सिलेंस’ आणि विद्यार्थ्यांना तांत्रिक क्षेत्रात प्रगत करण्याचा उद्धेश असून यामाहा डीलरशिपमध्ये नोकरी करण्यास देखील मदत करतील, यामाहा ट्रैनिंग स्कूल या कार्यक्रमा अंतर्गत महाविद्यालयाच्या परिसरात यामाहा तांत्रिक तज्ञांद्वारे समजविण्यात येईल तसेच यामाहाचा पाठींबा त्यांना त्यांच्या अर्थव्यवस्थेत सकारात्मक योगदान प्रदान करण्यास मदत करेल.
या उद्घटनाच्या प्रसंगी बोलतांना यामाहा मोटर इंडिया सेल्स प्रा. लिमिटेड चे स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग चे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट श्री.रविंदर सिंह म्हणाले की, “मागील काही वर्षांपासून यामाहाने संपूर्ण भारतातील यामाहा ट्रेनिंग सेंटर मध्ये नवीन टेक्नोलॉजी आणि टूल्स द्वारे ट्रेनिंग प्रदान करून प्रोग्रामची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला आहे. युवकांना त्यांच्या क्षमतेनुसार ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री मध्ये चांगले करियर करण्यासाठी सक्षम करणे या उद्धेशाने कोल्हापूर येथे ४१ वे यामाहा ट्रेनिंग सेंटर सुरु केले आहे.
यामाहा ट्रेनिंग स्कूल मध्ये चालविण्यात येणाऱ्या कोर्ससाठी इंडिया यामाहा मोटर (आयवायएम) प्रा. लिमिटेडने ऑटोमोटिव्ह स्किल्स डेव्हलपमेंट कौन्सिल (एएसडीसी) सोबत सामंजस्य करार केला आहे. “ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्नीशियन” क्षेत्रात एएसडीसी मान्यताप्राप्त करणारा हा पहिला ट्रैनिंग प्रोग्राम असून यामाहा ही भारतातील पहिली आणि एकमेव टू-व्हीलर कंपनी आहे. यामाहा टेक्निकल अॅकेडमी (वाईटीए) सर्टिफिकेशन सोबत यामाहा ट्रेनिंग स्कूल सुरू करण्यासाठी इंडिया यामाहा मोटर (आयवायएम) प्रा. लिमिटेड हे सरकारी आणि प्रायव्हेट टेक्निकल संस्था आणि एनजीओ सोबत भागीदारी करण्यास सज्ज आहे . युवकांना टू-व्हीलर टेक्नोलॉजी मध्ये प्रगत आणि प्रोत्साहित करण्यासाठी संपूर्ण भारतात यामाहा ट्रेनिंग सेंटर लॉन्च करण्याची योजना आखली आहे, तर यामाहाने कोल्हापूर येथील गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजमधील उद्घाटनासह संपूर्ण भारतात ४१ यामाहा ट्रेनिंग सेंटर सुरु केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *