विश्व ने जपली सामाजिक बांधिलकी :पूरग्रस्तांना लाखो रुपये किमंतीच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कोल्हापूर /प्रतिनिधी
विश्व मेडिकल अॅडमिशन पाँइट आणि राऊंड टेबल इंटरनॅशनल प्रणित कोल्हापूर राउंड टेबल १५४ (इंडिया) व कोल्हापूर लेडीज सर्कल १४८ यांच्या वतीने ‘बॅग ऑफ हॊप’ या उपक्रमांतर्गत वतीने कागल तालुक्यातील चिखली ,शिंदेवाडी ,मूरगूड आणि सोनगे येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
कोल्हापूर सह सांगली जिल्ह्यात ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरामुळे अनेक गावे पाण्याखाली गेलीत.तर होत्याच नव्हतं होऊन हजारो घर उध्वस्त झाली. त्याचबरोबर हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने पिके कुजून शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांच नुकसान झाले. तर पूरग्रस्त रस्त्यावर आल्याने त्यांचे जगणे कठीण झाले. त्यामुळे जिल्ह्यातील पूरग्रस्तांना सर्व स्तरातून मदतीचे हात पुढे आले. राज्यातून आर्थिक मदतीसह जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचा ओघ वाढला. दरम्यान विश्व मेडिकल अॅडमिशन पाँइट आणि राऊंड टेबल इंटरनॅशनल प्रणित कोल्हापूर राउंड टेबल १५४ (इंडिया) व कोल्हापूर लेडीज सर्कल १४८ यांच्या वतीने ‘बॅग ऑफ हॊप’ या उपक्रमांतर्गत वतीने कागल तालुक्यातील चिखली ,शिंदेवाडी ,मूरगूड आणि सोनगे येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. मुरगूड तालुका कागल येथील विश्वनाथराव पाटील सहकारी बँकेच्या सभागृहात पूरग्रस्त कुटुंबांना या बॅग वितरित करण्यात आल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष अजितसिंह पाटील होते.विश्व विश्व मेडिकल अॅडमिशन पाँइट चे संचालक प्रथमेश भस्मे यांच्या सह मित्र परिवाराने आतापर्यंत दहा लाखाहून अधिकची मदत पूरग्रस्तांना दिली असून एकूण २३ते२५ लाख रुपया पर्यंत सामाजिक बांधिलकी म्हणून मदत करण्याचा मानस असल्याचे विश्व चे संचालक प्रथमेश भस्मे यांनी सांगितले.यावेळी पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर आनंदाची मोहर उमटलेली पहावयास मिळाली.
यावेळी विश्व चे संचालक प्रथमेश भस्मे,कोल्हापूर लेडीज सर्कलच्या अध्यक्षा स्नेहा संघवी,सचिव इशा भस्मे, कोल्हापूर राऊंड टेबलचे अध्यक्ष कौशल संघवी,सचिव श्रेयस पाटील,आदित्य शहा,निखिल गुंदेशा,योगेश परमार,तुषार तेंडुलकर,नंदिनी गुंदेशा,हृतिका तेंडुलकर,बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास चौगुले,मुरगुड हायस्कुलचे उपप्राचार्य एस.पी.पाटील, उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!