विश्वतर्फे किरगिझ च्या इंटरनॅशनल स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये एमबीबीएस झालेले सर्व विद्यार्थी एमसीआयच्या परीक्षेत पहिल्याच टप्प्यात उत्तीर्ण

कोल्हापूर/प्रतिनिधी
विद्यार्थ्यांचे एमबीबीएस डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्रातील नामवंत असलेल्या विश्व मेडिकल अॅडमिशन पाँइटच्या वतीने २०१४ साली किरगिझ देशातील इंटरनॅशनल स्कूल ऑफ मेडिसिन या मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस शिक्षणासाठी पाठविण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या स्क्रिनिंग टेस्ट (एमसीआय परीक्षेत)मध्ये पहिल्याच टप्प्यात उत्तीर्ण होऊन उज्ज्वल यश संपादन केले.त्यामुळे एमसीआय पास विद्यार्थ्यांसह एमसीआय मार्गदर्शक आणि विश्व चे ज्ञानेश्वर भस्मे व प्रमोद सर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
भारतासह परदेशातून विद्यार्थ्यांचे MBBS डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे कार्य विश्व मेडिकल अँडमिशन पाँइट गेले २० वर्षे झाले अविरतपणे करत आहे.तर विश्व मेडिकल अँडमिशन पाँइटचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्राभर विस्तारला असून महाराष्ट्रात एकूण विश्वचे १६ कार्यालये आणि ३०० लोकांचा स्टाप आहे. तसेच विश्वने आतापर्यंत ३हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे MBBS डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.दरम्यान २०१४ साली किरगिझ देशातील इंटरनॅशनल स्कूल ऑफ मेडिसिन या मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस शिक्षणासाठी विश्व मेडिकल अॅडमिशन पाँइटच्या वतीने पाठविण्यात आलेले सर्व विद्यार्थी आपला ५ वर्षा चा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण करून भारतात परतले.तत्पूर्वी भारतामध्ये मेडिकल प्रॅक्टीस करण्या साठी प्रथम त्यांना मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया ची स्क्रिनिंग टेस्ट देणे गरजेचे असते.त्यामुळे २०१७-१८ मध्ये घेण्यात आलेल्या एमसीआयच्या परीक्षेत या विद्यार्थ्यांनी पहिल्याच टप्प्यात यश संपादन करून ऊंच भरारी घेतली. तर हे सर्व विद्यार्थी एमसीआयच्या परीक्षेत पहिल्या प्रयत्नात यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्याने आता भारतात मध्ये मेडिकल प्रॅक्टीस किंवा पी.जी.(P.G) करण्यासाठी पात्र ठरले आहेत.दरम्यान एमसीआयचे मार्गदर्शक आणि विश्व मेडिकल अॅडमिशन पाँइटचे संस्थापक ज्ञानेश्वर भस्मे आणि प्रमोद सर यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शन व योग्य सल्यामुळेच आम्ही किरगिझ मध्ये पाच वर्षाचा एमबीबीएस कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करून एमसीआय परीक्षेत पहिल्याच टप्प्यात उत्तीर्ण होवू शकलो.असे गौरवोद्गार यशस्वी विद्यार्थी आणि पालकांतून काढले जात आहेत.या किर्तीवंत यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी, एमसीआयचे मार्गदर्शक आणि विश्व मेडिकल अॅडमिशन पाँइटचे संस्थापक ज्ञानेश्वर भस्मे आणि प्रमोद सर यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन चा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!