“विश्व “मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात

कोल्हापूर /प्रतिनिधी
आषाढ महिन्यातील व्यास पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा विश्व मेडिकल अॅडमिशन पाँईटमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.
गुरु हा माणसाच्या जीवनातील एक अविभाज्य घटक मानला जातो. गुरु नसेल तर माणसाचे जीवन अपूर्ण आहे असे समजले जाते.गुरुमुळे माणसाचे जीवन
तेजोमय होते.आयुष्याच्या वाटेवर प्रगती आणि उन्नती साधायची असेल तर योग्य गुरु लाभवा लागतो. गुरुवीण कोण दाखविल वाट?अस म्हटलं जात.कारण माणसाच्या आयुष्यात सामाजिक, शैक्षणिक,आर्थिक,वैचारिक, आध्यात्मिक अशा प्रत्येक टप्प्यावर प्रगती साधायची असेल गुरुचे स्थान अग्रगण्य आहे.जन्मानंतर आई-वडिलांना बरोबर गुरुनांही तेवढेच महत्त्व आहे. अशाच वेगवेगळ्या क्षेत्रातील गुरुंना वंदन करून गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे आषाढ महिन्यातील व्यास पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा. तर सर्वत्र गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमाद्वांरे गुरुंना वंदन करण्यात आले. दरम्यान विश्व मेडिकल अॅडमिशन पाँईट आणि मिरर कोल्हापूर न्यूज च्या वतीने विश्वाचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर भस्मे ,प्रमोद सर यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करुन आदर सत्कार करण्यात आला.
यावेळी विश्वचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर भस्मे यांनी गुरुशिष्यांबद्दल माहिती गुरुंचा महिमा विशद केला. तर प्रमोद सर यांनी सर्व शिष्यांना गुलाबपुष्प देऊन शुभ आशीर्वाद दिले. दरम्यान माणसाला आयुष्याच्या वाटेवर प्रगती आणि उन्नती साधायची असेल तर योग्य गुरु लाभवा लागतो असे मत व्यक्त करून गुरुपौर्णिमाचे महत्त्व स्पष्ट केले.तर मिरर कोल्हापूर न्यूजच्या निवेदिका सौ.मयुरी घाटगे यांनी माणसाच्या जीवनातील गुरुंचे महत्व तसेच गुरुशिष्याचे नाते या विषयी एक कथा सादर करून मनोगत व्यक्त केले.
यावेळी ह्युमन राईट मिरर,मिरर कोल्हापूर न्यूज आणि विश्व मेडिकल अॅडमिशन पाँईटचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *