जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने कसबा बावडा मलनिस:रण प्रकल्पांचे परिसरात वृक्षारोपण

कोल्हापूर /प्रतिनिधी :- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने कसबा बावडा मलनिस:रण प्रकल्पांचे परिसरात आज महापौर सौ.सरीता मोरे व आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये तबोबीया, स्पॅटोडिया, अर्जुन, मुचकुंद, वड, पिंपळ, इत्यादीसह विविध प्रकारच्या झाडांच्या जाती लावण्यात आल्या. सदरच्या कार्यक्रमासाठी महनगरपालिकेचे सर्व माजी महापौर यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या नांवाचे फलक असलेले एक एक वृक्षाचे रोपन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच संपुर्ण कोल्हापूर शहरअंतर्गत 11000 वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले असून खड्डे मारण्याचे काम उद्यान विभाग मार्फत सुरु आहे. सदरचे वृक्ष शहरात ओपनस्पेस, झुम प्रकल्प व मलनिस:रण केंद्र, पुईखडी, महापालिकेचे ओपनस्पेस, उद्याने व रस्त्याच्या दोन्ही बाजूस लावण्यात येणार आहे.
यावेळी मे.इंफ्रास्ट्रक्चरचे लि.कंपनीचे हेमंत काशीद यांनी सांडपाणी प्रक्रिया केंद्राची माहिती उपस्थितांना दिली. यामध्ये या प्रक्रिया केंद्रात येणारे सांडपाणी कशापध्दतीने प्रक्रिया करुन ते शुध्द करुन शेतक-यांना शेतीसाठी मोफत दिले जाते याची माहिती दिली.
तसेच झुम प्रकल्प येथे वेस्ट टू एनर्जी प्रकल्प मेलहेम आयकॉस या कंपनीचे संचालक समिर रेगे यांनी प्रकल्पाअंतर्गत राबविणेत येणा-या कचरा विलगीकरण प्रक्रिया व उर्जा निर्मिती याबाबत माहिती दिली. हा प्रकल्प उर्जेच्याबाबत स्वयंपूर्ण व झिरो डिसचार्ज असल्याचे सांगितले.
आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बोलताना महानगरपालिकेने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महानगरपालिकेचे पदाधिकारी, माजी महापौर व नगरसेवकांसाठी एक गेट टूगेदरचे आयोजन केले असल्याचे सांगितले.. पंचगंगा नदीचे प्रदुषण कमी करणेसाठी नालेजोड प्रकल्प पुर्णत्वास आला आहे. त्यातील दोन नाले लोकसहभागातून पुर्ण केले आहेत. या मोहिमेत महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत. येथून पुढे कॉर्नर सभा घेऊन लोकांची जागृती केली जाणार आहे. जेणेकरुन लोक ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करतील. उद्यापासून कसबा बावडा परिसरातून असा वेगवेगळा कचरा गोळा करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येकाने एक निश्चय करुन एकतरी झाड लावावे. कोणाचा वाढदिवस, समारंभ, स्मृतीदिन असे विविध कार्यक्रमाचे औचित्यसाधून वृक्षारोपनाचे नियोजन करा असे आवाहन आयुक्तांनी यावेही केले.
माजी महापौरांच्या वतीने ऍ़ड.महादेवराव आडगुळे यांनी बोलताना सध्या महाराष्ट्र उष्णतेने होरपळत आहे. त्यामुळे पाण्याचे महत्व लोकांना कळत आहे. कोल्हापूराला अजून टंचाईची झळ बसलेली नाही. पण येणारी परिस्थितीचा विचार करता आताच पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. सर्वठिकाणी वृक्षलागवड झाली पाहिजे. आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्हिजन चांगले ठेवून चांगले काम करत आहेत. ते फक्त ऑफिसमध्ये बसून न राहता रस्त्यावर उतरून काम करत आहेत. कोल्हापूर शहर हे स्वच्छ व सुंदर करणेचे त्यांचे धोरण आहे. त्यांचा उपयोग विकासासाठी जास्तीत जास्त वापर करुन घ्या. त्यासाठी त्यांना सर्वांनी मिळून सहकार्य करा असे सांगितले..कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय वणकुद्रे यांनी केले.
यावेळी सौ. मधुरिमाराजे छत्रपती, प्राथमिक शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, परिवहन सभापती अभिजीत चव्हाण, राजसिंह शेळके, गटनेते सत्यजित कदम, नगरसेवक संदिप नेजदार, नगरसेविका सौ.माधूरी लाड, सौ.स्वाती यवलूजे, सौ. पुजा नाईकनवरे, सुरेखा शहा, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उप-आयुक्त मंगेश शिंदे, आरोग्यधिकारी दिलीप पाटील, सहा.संचालक नगररचना रामचंद्र महाजन, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नागेश लोहाळकर, उप-प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, अति.परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, नगरसचिव दिवाकर कारंडे, उपशहर रचनाकार एन.एस.पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक विजय पाटील, पर्यावरण अभियंता समिर व्याघ्रांबरे, उप-जल अभियंता रामदास गायकवाड, उप-शहर अभियंता हर्षजीत घाटगे, आर.के.जाधव, ड्रेनेज विभाग शाखा अभियंता आर. के. पाटील, माजी महापौर आर.के.पोवार, राजू शिंगाडे, शिरीष कणेरकर, दिपक जाधव, मारुतराव कातवरे, सौ.वंदना बुचडे, सौ.प्रतिभा नाईकनवरे, सौ.अश्विनी रामाणे, सौ.स्वाती यवलुजे, सौ.शोभा बोंद्रे, उदय गायकवाड, निसर्गमित्र संस्था अनिल चौगुले, तसेच प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्था अध्यक्ष दिलीप देसाई, क्रिडाईचे अध्यक्ष राजू पारिख, विदयानंद बेडेकर, आर्किटेक्ट आसोसिएशनेच अध्यक्ष अजय कोराणे, कॉ.दिलीप पोवार, हॉटेल मालक संघाचे बाळ पाटकणर, टोल विरोधी कृतीसमितीचे निवासराव साळोखे, मेलहेम आयकॉस कंपनीचे विराज कोप, श्री अशोक, प्राजक्ता पोतदार व नागरीक, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!