जागतिक पर्यावरण दिन विशेष वृत्त

कोल्हापूर प्रतींनिधी ( नम्रता गाडे ) : – पर्यावरण हा विषय आज देशपातळीवर न राहता जागतिक पातळीवर त्याचा विचार केला जाऊ लागला आहे. पर्यावरणाच्या सुरक्षेच्या आणि संरक्षणाच्या हेतूने हा दिवस पूर्ण जागतिक पातळीवर साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्र ने सामाजिक व राजकीय स्तरावर पर्यावरणाच्या दृष्टीने विचार केला जावा यासाठी सन 1972 साली केली होती. 5 जून ते 16 जून या दरम्यान संयुक्त राष्ट्र महासभेने आयोजित करण्यात आलेल्या विश्व पर्यावरण सम्मेलनमध्ये चर्चा सत्र आयोजित करून हा निर्णय घेण्यात आला. 5 जून 1974 साली पहिला विश्व पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. दरवर्षी 100 हून अधिक देश यामध्ये सहभागी होतात.
कोल्हापूरमध्ये देखील हा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. पर्यावरणाच्या दृष्टीने अनेक समस्या आज आपल्या समोर आहेत. त्यामध्ये पंचगंगा प्रदूषण, कचरा विल्हेवाट, प्लॅस्टिक बंदी असे कितीतरी पर्यावरणाविषयी मोठे विषय आपल्या कोल्हापूरमध्ये गाजलेले आहेत. याच प्रश्नावर फक्त लोक प्रतींनिधी किंवा महानगर पालिका यांनीच फक्त लक्ष घालावे असे आपल्या नागरिकांचे म्हणे असते. पण पर्यावरण रक्षणाची, संरक्षणाची गरज आपल्या घरातून करून या प्रतींनिधींना त्यासाठी सहाय्य करणे हे देखील आपलेच कर्तव्य आहे हे आपण विसरून चालणार नाही. तसेच या पर्यावरणाविषयी लहानपणापासूनच मुलांच्यामध्ये जंनजागृती निर्माण करण्यासाठी शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये हा पर्यावरण अभ्यास विषय दिला आहे.
आपण सामान्यपणे पर्यावरण हा अभ्यास पर्यावरण विज्ञान, पर्यावरण शिक्षण व पर्यावरण तंत्रज्ञान या माध्यमातून केला जातो. यावरूनच कळते की, आज पर्यावरणीय शिक्षणातील प्रगल्भता , जागरूकता, दृष्टीकोण, ज्ञान, कौशल्य आणि सहभाग किती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *