एमपीएससी, यूपीएससीशिवाय हजारो सरकारी नोकऱ्यांची माहिती देणारे जिनिअस अॅकॅडमीचे नवीन अँप उपलब्ध

कोल्हापूर/प्रतिनिधी : पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांला सरकारी नोकरी मिळावी अशी अपेक्षाअसते. मात्र, सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एमपीएससी किंवा यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात.असा गैरसमज विद्यार्थांमध्ये आहे.एमपीएससी, यूपीएससीशिवाय सरकारी नोकरीचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या हजारो नोकरीविषयक उपक्रमांची माहिती देण्यासाठी एज्यु जिनियस अॅकॅडमी अँप तयार करण्यात आले आहे. अशी माहिती जिनियस अॅकॅडमीचे मार्केटिंग हेड प्रवीण शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पदवीनंतर हजारो विद्यार्थी एसपीएससी, यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांवर अवलंबून असतात मात्र, या परीक्षेद्वारे भरल्या जाणाऱ्या जागा आणि अर्ज करणारे विद्यार्थी यात खूप मोठी तफावत आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थी परीक्षेत अपयशी ठरतात. यातही अपयश येण्याचे मुख्य कारण म्हणजे बी एस्सी किंवा इजिनिअरिंगचे विद्यार्थी जेव्हा या परीक्षा देतात त्यावेळेस त्यांना एकूण ८ विषयांचा अभ्यास करावग लागतो. त्यापैकी इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि मराठी हे कलाशाखेचे विषय असतात .
तर आर्टस् च्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान विषयांचा अभ्यास करावा लागतो. जे आवडत नाहीत म्हणून किंवा ज्या विषयात करिअर करावय नसते म्हणून दहावीनंतर सोडून दिलेले असतात.त्याच विषयांना स्पर्धा परीक्षेत सामोरे जावे लागत. त्यामुळे चार-पाच वर्षे अभ्यास करूनही अपयशी झाल्यानं पदरी नैराश्य पडते .त्यावर उपाय म्हणून एज्यु जिनियस अँकडमी अँप निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.या मध्ये एमपीएससी,यूपीएसी शिवाय केंद आणि राज्य सरकारच्या अनेक नोकऱ्यांची माहिती उपलब्धआहे. तसेच विद्यार्थ्यांनी ज्या विषयांमध्य डिग्री प्राप्त केलेली आहे. त्यानुसार नोकऱ्यांची माहिती उपलब्धआहे. नोकरी, त्यासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, जाँब लोकेशन,वेतन अथवा मानधन याबाबतची सविस्तर माहिती या अँपमध्ये आहे.अशाच पद्धतीने आर्टस्, सायन्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग, डिप्लोमा, आयटीआय अशा अभ्यासक्रमानुसार विविध सरकारी नोकऱ्यांची माहिती यामध्ये देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे करिअरचे अनेक मार्गही या अँपमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. एमपीएससी, यूपीएससीशिवाय सरकारी नोकरी मिळत नाही, असा समज असलेल्या विद्यार्थ्यांना या अँपद्वारे मोठा दिलासा मिळणार आहे .हैं अँप प्लेस्टोअरला एज्यु जिनिअस अकॅडमी या नावाने उपलब्ध आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन प्रवीण शिंदे यांनी केले.
पत्रकार परिषदेला समीत देशपांडे, हर्षल पन्हाळकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!