ह्युमन राईट मिरर
Friday, 24 May 2019

वालचंद महाविद्यालयात इंटर्नशालाचा सेमिनार

इंटर्नशिप उपलब्ध करून देणारी इंटर्नशाला ही जगातील नं. 1 वेबसाईट आहे. सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग या महाविद्यालयात दि. 22 जानेवारी, 2019 रोजी ‘हाऊ टू लॅंड यूअर ड्रीम इंटर्नशिप थ्रू इंटर्नशाला’ या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आला होता. हा सेमिनार इंटर्नशालाचा वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, सांगली या महाविद्यालयाचा सध्या कॅम्पस अँबेसिडर असलेला तृतीय वर्ष संगणक विभागचा विद्यार्थी अझीम इन्नुस पठाण याने आयोजित केला होता.
सेमिनार मध्ये ‘इंटर्नशिप्स उच्च पगाराच्या नोकरी मिळवण्यासाठी कशा उपयुक्त ठरतात’, ‘बेरोजगारीची प्रमुख कारणे’, ‘इंटर्नशाला तुम्हाला कशी मदत करू शकते’, ‘इंटर्नशाला वेबसाईटवर इंटर्नशिपसाठी अर्ज कसे करावे’, ‘नोकरी भरतीसाठी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना आदर्श उत्तरे कशी लिहावीत’, ‘इंटर्नशाला कोणकोणत्या प्रकारचे अॉनलाईन प्रशिक्षण देते व त्यांवर सवलत कशी मिळवावी’ या महत्त्वाच्या विषयांवर त्याने उपस्थित कॉलेजच्या विद्यार्थ्यांना संबोधले.
प्रथम, द्वितीय, तृतीय व बी.टेक अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनीही सेमिनारला उपस्थिती नोंदवली. सेमिनार यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्राजक्ता पोवार, शुभम गादिया, अविनाश शिंदे, भावना अकिवते व अविनाश भुतेकर या विद्यार्थ्यांनी अझीमला मदत केली. संगणक विभागचे प्रमुख डॉ. मोमीन सर, प्रो. सुर्वे सर, प्रो. सोनटक्के सर व प्रो. पवार मॅडम यांनी अझीमच्या कौतुकास्पद कामाचे समर्थन केले.
Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *