ह्युमन राईट मिरर
Friday, 24 May 2019

मतदारा़नी निर्भयपणे व शांततेत मतदान करावे

कागल/प्रतिनिधी : काेल्हापूर लाेकसभा मतदार संघात २३एप्रील २०१९ राेजी मतदान हाेत आहे.मतदारा़नी निर्भयपणे व शांततेत मतदान करावे.निवडणुक आयाेगाने घालून दिलेल्या आचारसंहितेचे पालन काटेकाेरपणे करावे.कायद्याचा बडगा उगारावा लागू नये यासाठी राजकीय नेतेमंडळी सह सर्वानीच दखल घ्यावी असे आवाहन कागलचे तहसिलदार तथा अतिरिक्त सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी गणेश गोरे यांनी पत्रकार बैठकित केले.
कागल तहसिलदार कार्यालयात पत्रकार बैठकीचे आयाेजन करण्यात आले हाेते. राष्ट्रवादी काँग्रेस कागल शहर अध्यक्ष संजय चितारी, भाजपचे करणसिंह घाटगेआदिंसह विवीध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित हाेते.
आचारसंहिता काळात वाहनावर राजकिय व्यक्तीचा फाेटाे लावता येणार नाही.पैशाचे वा अन्य काेणतेहीअमिष दाखविता येणार नाही.असे सांगत तहसिलदार गोरे म्हणाले,नेते किंवा कार्यकर्ते यांच्या खाजगी पैलूवर टिका करू नये.जातीय तेढ निर्माण हाेता कामा नये .सभा मिरवणुकामध्ये अडथळा करू नये .काे्णीही शस्त्र जवळ बाळगू नये.निवडणूक काळात दारू वाटप करू नये.ध्वनिक्षेपकाचा वापर सकाळी सहा ते रात्री १० पर्यंतच करावा .
ते पुढे म्हणाले,गंभीर आजारी व्यक्तीना राेख रक्कम अथवा वैद्यकिय सुविधा पुरविता येतात.असे सांगत व्हि व्ही पँट मशिन बाबत माहिती देतांना तहसिलदार गाेरे म्हणाले,मतदाराची विश्वासार्हता व आपण दिलेले मत आपल्याच उमेदवाराला मिळाले की नाही याची शहानिशा हाेते.सात सेकंदासाठी पक्षाचे चिन्ह,नांव समाेर दिसते. व ही चिठ्ठी मशीन मध्ये जमा हाेते. असे सांगत ते म्हणाले,कागल विधान सभा मतदार संघात३५१ मतदान केंद्रे व ३राखीव केंद्रे असे एकूण३५४ के़द्रे आहेत . काेल्हापूर लाेकसभा मतदान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी दाैलतराव देसाई हे काम पाहत आहेत असे त्यांनी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *