विश्व हिंदू परिषद तर्फे लेह – लडाखमध्ये २३ते२६जून दरम्यान सिंधू दर्शन यात्रेचे आयोजन

कोल्हापूर /प्रतिनिधी
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिं.२३ते२६जून दरम्यान लेह(लडाख)येथे सिंधू दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आलय.गेल्या २२वर्षापासून सुरू असलेल्या या उत्सवाचे यंदाचे हे २३वे वर्ष असून या यात्रेस जाण्यासाठी दिं.१८जूनला चंदीगड आणि जम्मू या दोन ठिकाणी यात्रेत सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंनी एकत्र जमण्याच आहे. अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे शहर सहमंत्री अँड.सुधीर जोशी(वंदूरकर) यांनी पत्रकार बैठकीत दिली.
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सिंधू दर्शन यात्रेस १९९७ साली सुरुवात करण्यात आली. देशातील यात्रेपैकी सिंधू दर्शन यात्रा महत्त्वाची मानली जाते.राष्ट्रीय एकता व अंखडता आणि बौध्द -वैदिक समन्वयाचा परिचय करून देणारा हा उत्सव असून यंदा २३ते २६जून दरम्यान लेह(लडाख)येथे या उत्सवाचे आयोजन करण्यात आलय.या यात्रेचे देशात चंदीगड व जम्मूकाश्मीर असे दोन मार्ग असून दिं.१८जूनला याच ठिकाणी सहभागी यात्रेकरूंनी जमण्याच आहे.नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या हिमालयीन क्षेत्रास पाहण्याचा योग या उत्सवात येणार आहे. लेह लडाख व सिंधू नदीचा परिसर भगवान गौतम बुद्ध, गुरुनानक, भगवान झुलेलाल या संताची कर्मभूमी आहे.चार दिवसाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर या उत्सवामध्ये जम्मू काश्मीर ,कारगील, लेह-लडाख येथील प्रेक्षणीय ऐतिहासिक ठिकाणे पाहण्याची व अभ्यासण्याची संधी मिळणार आहे. हा उत्सव एक राष्ट्रीय सेवा म्हणून साजरा केला जात असल्यान यास अत्यंत माफक म्हणजे २० हजार रुपये फी आकारण्यात येत आहे. सिंधू दर्शन यात्रेस यंदा देशभरातून एक लाखापेक्षा अधिक लोक तर कोल्हापूर जिल्ह्यातून ५०लोक सहभागी होण्याची अपेक्षा असल्याच विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सांगण्यात आल.
पत्रकार बैठकीला विश्व हिंदू परिषदेचे शहराध्यक्ष व केंद्रीय कार्यकारणी सदस्य अशोक रामचंदानी ,कैलास काईंगडे,प्रसाद जाधव,अनिल कोडोलीकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!