विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये बँकिंग परीक्षेच्या इंग्रजी विषयासाठी ३ दिवसीय मोफत कार्यशाळा

कोल्हापूर: स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना बँकिंग विभागामध्ये इंग्रजी या विषयाची अनामिक भिती विद्यार्थ्यांमध्ये असते. दिवसेंदिवस परीक्षांचे स्वरूप सुद्धा खूप बदलत आहे. या बदलत्या स्वरूपानुसार इंग्रजी या विषयाचे स्वरूप सुद्धा खूप प्रमाणात अवघड झाले आहे. परंतु याच अवघड विषयाची तयारी तयारी व्यवस्थित नियोजन करून व प्राथमिक गोष्टी समजावून घेऊन केली तर या अवघड विषयावर मात करणे अवघड नाही.

स्टेट बँकेच्या PO व Clerk या आगामी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्या प्रबोधिनीमध्ये ३ दिवसीय मोफत इंग्रजी विषयाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्याचे मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी शिक्षिका पुण्याहून येणार आहेत. ही कार्यशाळा १७, १८, १९ रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत विद्या प्रबोधिनी मध्ये होणार आहे. कार्यशाळेची नोंदणी विद्या प्रबोधिनी मध्ये सुरु झाली आहे.

तरी इंग्रजी विषयासाठी उपयुक्त अशा या कार्यशाळेचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *