ह्युमन राईट मिरर
Friday, 24 May 2019

सीपीआर मधील विविध समस्यांबाबत सोमवारी मुंबईत बैठक:आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मध्यस्थीने कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मागे

कोल्हापूर /प्रतिनिधी
वैद्यकीय शिक्षण विभागातील करार पद्धतीवरील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वेतनाबाबत अचानक सुरु केलेल्या काम बंद आंदोलनामुळे रुग्णालयाची सेवा कोलमडली होती. याबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी तातडीने सीपीआर रुग्णालयात बैठक घेतली आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. तात्यासाहे लहाने यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सीपीआर रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध प्रश्नांबाबत तातडीची बैठक आयोजित करण्याबाबत मागणी केली. यावर वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी याप्रश्नी सोमवार दि.१८ मार्च रोजी मुंबई येथे बैठक घेण्याची ग्वाही दिली. तर आमदार राजेश क्षीरसागर यांच्या यशस्वी मध्यस्थीने कंत्राटी कर्मचाऱ्यानी आपला संप मागे घेतला.
सकाळीच सीपीआर रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचार्यांनी प्रलंबित वेतनाबाबत काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला. याबाबत कर्मचार्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधून याप्रश्नी तोडगा काढण्याविषयी विनंती केली. यावर आमदार राजेश क्षीरसागर यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाटा डॉ. मिसाळ यांच्याशी संपर्क साधून कंत्राटदार कंपनी, कर्मचारी आणि प्रशासन यांची तातडीची बैठक आयोजित करण्याच्या सुचना दिल्या.
सीपीआर मध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांनी आंदोलन करणाऱ्या कर्मचार्यांची भेट घेवून समस्या जाणून घेतली. यावेळी कर्मचार्यांनी गेले दोन – अडीच महिने पगार झाला नसल्याची व्यथा आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासमोर मांडली.
यानंतर झालेल्या बैठकीत बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर जिल्ह्यसह आसपासच्या भागासाठी वरदायनी असलेले रुग्णालय बंद पाडण्याचा घाट घातला जात आहे का? सर्वसामन्य माणसांना उपचाराअभावी येथून परतावे लागू नये यासाठी शासकीय स्तरावर आम्ही प्रयत्न करीत असताना अधिकार्यांच्या नाकर्तेपणामुळे सीपीआर रुग्णालयाची प्रतिमा डागाळली जात असल्याची टीका केली. उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या तक्रारी सोबत आता कर्मचार्यांचे प्रश्नही भेडसावू लागले असल्याचे सांगितले. कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत ठेकेदार कंपनीस विचारणाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली.
यावर कंपनीच्या कर्मचार्यांनी गेले आठ महिने कामाचे बिल प्रशासनाने दिले नसल्याचे सांगितले. यावर आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रभारी अधिष्ठाटा डॉ. मिसाळ यांनी ही बिले मंत्रालय स्तरावर प्रलंबित असल्याचे सांगितले यासह रुग्णालयाचे पाणी बिल आणि लाईट बिल प्रलंबित असल्याचीही माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांना दिली.
यावर आमदार राजेश क्षीरसागर यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. तात्यासाहेब लहाने यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सीपीआरमधील प्रश्नांची माहिती देत याप्रश्नी तत्त्डीची बैठक आयोजित करण्याची मागणी केली. यावर वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी सोमवार दि. १८ मार्च २०१९ रोजी मुंबई येथे बैठक घेण्याची ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांना दिली.
दरम्यान संप केलेल्या कर्मचार्यांना तूर्तास एक महिन्याचे वेतन अदा करण्याच्या सुचना ठेकेदार कंपनीस दिल्या. ठेकेदार कंपनीने आमदार राजेश क्षीरसागर याची सूचना मान्य करून कर्मचार्यांना एक महिन्याचा पगार अदा करण्याचे मान्य केले. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या या यशस्वी मध्यस्थी नंतर कर्मचार्यांनी आपला संप तूर्तास मागे घेतला आहे.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, डॉ. माळी, एओ श्री. काटकर, किशोर घाटगे, प्रशांत जगदाळे, अंकुश निपाणीकर, राजू काझी, शाम जाधव, अभ्यागत समिती सदस्य सुनील करंबे, कर्मचारी सेनेचे अनिल माने, शंकर कांबळे, सुजित सावंत, राहुल वायदंडे, सौ.नबोबी मकानदार, सौ. नलिनी पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *