आम्हाला चौकीदार नको आम्हाला मालक हवाय

कोल्हापूर दि.१७ (प्रतिनिधी) : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार खा. धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी आयोजीत केलेल्या सभेत शदर पवार यांनी मोदी सरकारवर टिका करताना आम्हाला चौकीदार नको आम्हाला मालक हवाय, असा टोलाही शरद पवार यांनी नरेंद्र मोदींना लगावला आहे.
यावेळी त्यांनी भाजपसह नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. सीमेचे रक्षण करण्याची जबाबदारी तुमची आहे पण तुम्ही ती पार पाडली नाही, तुमच्या हातून देशाचे रक्षण होणार नाही, त्यामुळे बदल करण्याची आमची भूमिका आहे. पहिल्यांदा मतदान करणाèया मतदारांना मोदी पुलवामामध्ये शाहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून मतदान करा म्हणतात. पण सैन्य दलाचे जवान गेले त्यांच्या कुटुंबीयांचा विचार नाही. त्यांना शाहीद दर्जा देण्यासाठी काही पाऊले उचलली नाहीत. पुलवामामध्ये स्फोट झाला त्या गाडीतून आलेली स्फोटके आली कशी? असा प्रश्न उपस्थित करत सैन्याच्या शौर्याचे श्रेय मोदींनी घेतल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी सुमारे आठ हजार कोटींचा निधी आणून विकास कामे मार्गी लावली आहे. तर कायदा बदलून रखडलेल्या शिवाजी पुलाचा प्रश्न मार्गी लावला.गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामाची शिदोरी घेऊन निवडणूकी समोर जात आहे.
विरोधी उमेदवार वडिलांचा वारसा सांगत निवडणूक लढवत आहेत. मात्र खासदार होण काय अनुकंपाखालीलनोकरी आहे काय.खासदार धनंजय महाडिक यांची संजय मंडलिकांवर टीका केली. तर स्वर्गीय सदाशिव मंडलिक यांनी कर्जमाफी झाल्यानंतर तक्रारी करून जिल्ह्यातील शेतकèयांच्या घरावर दरोडा टाकण्याच काम केल.. ज्या ज्या वेळी कोल्हापूरवर संकट आल ..त्या-त्यावेळी तुमचा खासदार धनंजय महाडिक कोल्हापूरकरांच्या पाठीशी राहिला असल्याचेही स्पष्ट केले. कोल्हापूरात झालेल्या प्रत्येक आंदोलनात धनंजय महाडिक सहभागी होते. मात्र विरोधी उमेदवार कुठही दिसला नाही.खासदार म्हणून निवडून द्या तुमचा खासदार कोल्हापूरकरांच्याजनतेसाठी उर्वरित सर्व आयुष्य देण्यासाठी तयार खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन केलं तर कोल्हापूरचा माल जगाच्या पाठीवर जातो. याची प्रचीती जेंव्हा परदेशदौरा करत असताना आल्याचे स्पष्ट केले. सतत पन्नास वर्ष निवडणून आलो ते मातेच्या आशीर्वादाने कारण माझी आई कोल्हापूरची आहे माझे आजोळ कोल्हापूरमध्ये आहे.त्यामुळे मला कोल्हापूरचा अभिमान आहे. लोकसभेच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये घर केलेला खासदार म्हणजे धनंजय महाडिक हा लोकांच्या संघर्षासाठी झटणारा खासदार आहे. असा कोण खासदार हा जो प्रश्न देशाच्या संसदेत विचारला तर एकच नाव येतते म्हणजे खासदार धनंजय महाडिक लोकांनी देशाची लोकशाही जतन केली.राज्यातील लोकशाही टिकली ती लोकांच्या श्रद्धेमुळ आज संपूर्ण राज्यात देशात बेकारी वाढतेय तरुणांच्यात निराशायेत आहे मोदी सरकारच्या काळात देशात शेतकèयांच्या आत्महत्या वाढल्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली मात्र मोदी सरकारला केलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात देशात सत्तर हजार कोटींची कर्जमाफी करण्यातआली..मात्रच कोल्हापूर जिल्ह्यातज काही लोकांच्य ाराजकारणामुळे झालेल्या कर्जमाफीची शेतकèयांना परतफेड करण्यात आली आणि कर्जमाफीलाचा फायदा शेतकèयांना घेता आला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *