समग्र शिक्षा अंतर्गंत दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालकांचे प्रशिक्षण संपन्न

कोल्हापूर दि. 14 -जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, कोल्हापूर व प्राथमिक शिक्षण समिती, महानगरपालिका कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्याचे पालकांचे समावेशनावर आधारीत शहरस्तरावर पालक प्रशिक्षण विद्याभवन (मुख्याध्यापक संघ) कोल्हापूर येथे दि. 13 व 14 मार्च, 2019 रोजी पार पाडले. दिव्यांग मुलांना सामाजिक सुरक्षा, संपूर्ण अधिकार, समान संधी मिळावी त्यांना कोणी कमी लेखून नये तसेच त्यांना मिळणऱ्या शैक्षणिक सेवा सुविधा, वैद्यकीय मोफत सेवा, साधन साहित्य याच्याविषयी पालकांना माहिती होणेसाठी पालक प्रशिक्षणाचे आयोजन करणेत आले.
सदरच्या पालक प्रशिक्षणासाठी डीआयसीपीडी चे प्राचार्य मा. डॉ. आय.सी. शेख यांनी पालकांना दिव्यांग विद्यार्थ्यांबद्दल सामाजिक दृष्टीकोन बदलून त्यांच्या गुणांना वाव देण्याचे सांगितले. तसेच संपूर्ण जिल्हयातील एक हजार शिक्षकांना डीआयसीपीडी विभागातून ʅदिव्यांग विद्यार्थी अध्यापन व मूल्यमापन पद्धतीʆ याबाबत प्रशिक्षण दिले जात आहे, असे सांगितले.
प्राथमिक शिक्षण समिती, महानगरपालिका कोल्हापूरचे प्रशासनाधिकारी एस.के. यादव यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालकांना ʅआयुष्य सुंदर आहे, आपले मुलांना घडविण्याचा प्रयत्न करावाʆ असे सूचित केले. सदर कार्यक्रम प्रसंगी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील यांनी मनपा कोल्हापूर कडून दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्यभूत सेवा सुविधा, साधनसाहित्य, शिष्यवृत्ती दिली जाते, याची माहिती दिली.
डीआयसीपीडी च्या जेष्ठ अधिव्याख्याता मा. पल्लवी चिंचोळकर यांनी दिव्यांग मुलांना स्वावलंबी बनविण्याकडे कल देणेविषयी सांगितले. डीआयसीपीडी- जिल्हा सक्षमीकरण समन्वयक शकीला मुजावर यांनी दिव्यांग विद्यार्थी, शिक्षक, पालक समावेशित शिक्षण विभागामार्फत सर्व प्रकारचे मार्गदर्शन कसे केले जाते, याबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी शिक्षण विभागाकडील राजेद्र आपुगडे, सई कांबळे, आदिती जाधव, दिपाली नाईक, विक्रमसिंह भोसले, शमा खोमणे, शरद गावडे, सुनिता घुणकीकर यांनी प्रशिक्षणास उपस्थित राहून पालकांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!