ह्युमन राईट मिरर
Friday, 24 May 2019

टोयोटा आपल्या मेमोरेबल मार्च कॅम्पेन सोबत वाढवणार ग्राहकांचा उत्साह

टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनी ग्राहकांचा आनंद वाढविण्यासाठी सतत प्रयत्न करत असते, कंपनी ने वार्षिक विक्री मोहिमे अंतर्गत मेमोरेबल मार्च कॅम्पेन ची सुरुवात केली आहे. देशातील टोयोटा डीलरशिपमध्ये मार्च महिन्यात निवडण्यात आलेल्या सर्व मॉडेल्स वर ग्राहकांना आकर्षक ऑफर आणि फायदे मिळतील.
या कॅम्पेनबद्दल बोलतांना, टोयोटा किर्लोस्कर मोटरचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर श्री.एन.राजा म्हणाले की,”ब्रँड म्हणून टोयोटा नेहमीच ग्राहक केंद्रित असून आमच्या ग्राहकांना काय हवे आहे हे आम्ही नेहमी ऐकत असतो. मेमोरेबल मार्च कॅम्पेनद्वारे आमच्या उत्पादनांवर आपला विश्वास आणि आत्मविश्वास दर्शविण्याऱ्या ग्राहकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आहे. आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सुरक्षा वैशिष्ट्ये, कार्यक्षमता,आराम, उच्च इंधन इकोनॉमी आणि कमी किंमतीच्या मालकीसह सर्वोत्तम गुणवत्ता प्रदान करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
आमच्या ग्राहकांच्या अपेक्षांपेक्षा अधिक काम करून आम्ही नेहमीच आमच्या उत्पादनांची आणि सेवांची गुणवत्ता, टिकाऊपणा आणि विश्वासार्हतेच्या गुणवत्ते सह “बेस्ट इन टाउन” चा अनुभव प्रदान करतो.
मालकीचा आनंद वाढविण्यासाठी टोयोटा कंपनीने ग्राहकांसाठी मेमोरेबल मार्च कॅम्पेन अंतर्गत रोमांचक ऑफर सादर केल्या आहेत.
उत्पादन फायदे
यारीस २०/२० ऑफर जेथे ग्राहक २०,००० रूपयाचे डाऊन पेमेंट भरू शकतात व २०,००० रुपये ईएमआय द्वारे देऊ शकतात .
कोरोला अल्टीस १,२०,००० रू. पर्यंत
फॉर्च्यूनर ४०,००० रू. पर्यंत
इनोव्हा क्रिस्टा ५५,००० रू. पर्यंत
इटिओस ४८,००० रू. पर्यंत
लिव्हा २८,००० रु पर्यंत

टोयोटा तर्फे सरकारी आणि कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांसाठी विशेष लाभासह सीएसडी (CSD) मध्ये यारिस आणि इनोव्हा क्रिस्टा जी जीइएम (GeM) मध्ये उपलब्ध आहेत. सर्व ग्राहक ३१ मार्च २०१९ पर्यंत या सर्व ऑफर्स चा लाभ घेऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *