आरसेटी केंद्रामार्फत मोफत प्रशिक्षण

कोल्हापूर, दि. 4 : भारत सरकार ग्रामीण विकास मंत्रालय व महाराष्ट्र सरकार यांच्या समन्वयाने कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बेरोजगार युवक युवतींना तसेच बचत गटातील महिलांसाठी बॅक ऑफ इंडिया मार्फत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी केंद्र) स्थापन केले आहे. सन 2019-20 या
वर्षासाठी वेगवेगळया व्यवसायिक प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी केंद्रा) मार्फत पुढीलप्रकारे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यामध्ये पेपर कव्हर, लिफाफा व फाईल तयार करणे, कुक्कुटपालन व्यवसाय, महिला शिंपी (टेलर), जनरल (इडीपी), दुग्धव्यवसाय व गांडुळखत निर्मिती, शेळीपालन, ब्युटी पार्लर व्यवस्थापन, लघु उद्योजकांसाठी इडीपी, बँक मित्र, मेणबत्ती बनविणे, व्यवसाय करसपॉंडन्स आणि व्यवसाय सुविधा, फास्ट फुड स्टॉल उद्यमी, भाजीपाला रोपवाटीका व्यवस्थापन व लागवड, मधुमक्षिका पालन, पापड लोणचे व मसाला पावडर बनविणे, मशरुम लागवड, अगरबत्ती बनविणे व व्यवसायिक फुलशेती इत्यादीबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणसाठी येणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना मोफत भोजन व राहण्याची सुविधा करण्यात आली असून प्रशिक्षणासाठी किमान शैक्षणिक पात्रता 7 वी पास आवश्यक व वयोमर्यादा 18 ते 45 वर्षापर्यंत आहे. ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील युवक-युवतींचे सन 2002 च्या दारिद्रय रेषेमधील कुटुंबातील नांवअसणे गरजेचे आहे. तसेच आधार कार्ड, 6 फोटो, दारिद्रय रेषेचा दाखला, रेशनकार्ड, रहिवाशी दाखला,
शाळेचा दाखला, वयाचा पुरावा व मतदान ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी केंद्र), 1519-सी, जयधवल बिल्डीं, तिसरा मजला, लक्ष्मीपुरी कोल्हापूर दुरध्वनी क्रमांक (0231)
2325132 येथे संपर्क साधावा असे आवाहन आरसेटी संचालक सोनाली माने यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *