यंदा गरजू मुलींसह महिलांना शिक्षण, प्रवासासाठी आधार देणार संवेदना सोशल फौंडेशन :राहूल चिकोडे

कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील गरजू मुलींसह महिलांना यंदा शिक्षण आणि प्रवासासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रेरणेतून संवेदना सोशल फौंडेशनच्या वतीने मदत करण्यात येणार असून जिल्ह्यातील गरजू गरीब मुलीसंह महिलांनी आपल्या मागणीचा उल्लेख असलेला सविस्तर अर्ज जरगनगर येथील संवेदना सोशल फौंडेशनच्या कार्यालयात करावा. या अर्जाची छाननी होऊन योग्य गरीब ,गरजू अर्जदारांना मदत करण्यात येणार असल्याच संवेदना सोशल फौंडेशनचे राहूल चिकोडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
कोल्हापूरात एप्रिल २०१८ ला स्थापना करण्यात आलेल्या संवेदना सोशल फौंडेशनच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्य व प्रेरणेतून गेल्या वर्षभरात अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्यात.यामध्ये तर “पाच रुपयात चपाती-भाजी “हा सामाजिक उपक्रम गरीब गरजू व रुग्ण यांच्यासाठी महत्त्वाचा ठरत असून याचा दररोज जवळपास एक हजार व्यक्ती लाभ घेत आहेत.तसेच फौंडेशनच्या माध्यमातून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यामध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्यात आली आहेत. याची स्वच्छता ही महिला बचत गटांच्या माध्यमातून होत असून महिलांना रोजगार निर्मिती होण्यास यामुळे मदत झाली होतेय.तर कोल्हापूर शहरातील झोपडपट्टी भागातील मुलींसाठी डोळे वेडेवाकडे दात यांची तपासणी वर्षातून दोनदा करण्यात येते शहर व जिल्ह्यातील तालीम संस्था इमारत बांधणी व ग्रंथालय धार्मिक मंदिर उभारण्यासाठी वेळोवेळी मदत करण्यात येते. आजच्या तरुण पिढीला इतिहासाची प्रेरणा मिळण्यासाठी सोशल फौंडेशनच्या माध्यमातून 3900 सहभागी झालेली पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती ही मोहीम पहिली मोहीम ठरली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थी यांच्यासाठी दरीतुन आडवाटेची सहल नवदुर्गा देव दर्शन सहल तर नवरात्र मध्ये नवदुर्गा दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आलय.अशा सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या संवेदना सोशल फौंडेशन आता पुढचे पाऊल म्हणून जिल्ह्यातील गरीब, गरजू मुलींसह महिलांना शिक्षण आणि प्रवासासाठी मदत करणार असून यासाठी गरबी गरजू महिला, मुलींनी जरगनगर येथील संवेदना सोशल फौंडेशनच्या कार्यालयात आपल्या मागणीचा सविस्तर अर्ज करावा असे आवाहन राहूल चिकोडे यांनी यावेळी सांगितल.
पत्रकार परिषदेला काशीनाथ मेणे,शंतनू मोहिते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!