मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करा -पुणे विभागीय उपायुक्त

कोल्हापूर, दि. 23: लोकसभा निवडणूकीच्या आदेशाअनुषंगाने जिल्ह्यात तयार करण्यात आलेल्या सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची दक्षता घ्यावी,अशी सुचना पुणे विभागीय उपायुक्त तथा विभागीय नोडल अधिकारी पी.बी. पाटील यांनी आज येथे बोलताना केली.कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील निवडणूकीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहुजी सभागृहात आयेाजित केलेल्या बैठकीत उपायुक्त पी.बी. पाटील बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ,
उपजिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर, जिल्हा प्रशासन अधिकारी नितिन देसाई,खर्च समितीचे नोडल अधिकारी संजय राजमाने, मिडीया कक्षाचे नोडल अधिकारी धनंजय आधंळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, निवडणूक तहसिलदार अरुणा गायकवाड, नायब तहसिलदार प्रकाश दगडे यांच्यासह सर्व नोडल अधिकारी,सहाय्यक नोडल अधिकारी आणि अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने सर्वच पथकांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वे तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, अशी सूचना करून उपायुक्त पी.बी. पाटील म्हणाले,
निवडणूकीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांच्या माध्यमातूनही आढावा घेण्यात येत असून यावर सर्वच नोडल अधिकाऱ्यांनी आवश्यक दक्षता घेऊन उपाययोजना कराव्यात. यावेळी उपायुक्त पी.बी. पाटील यांनी आचारसंहिता कक्ष, अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती व प्रशिक्षण, ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन, मतदान जागृती, वाहतुक आराखडा, खर्च समिती, आचारसंहितेबाबत तक्रारीसाठी संपर्क कक्ष,मिडीया कक्ष अशा सर्वच कक्षांच्या कामकाजांचा आढावा घेतला. प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी स्वागत करून जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *