कंटेनर व क्रुझर यांच्या धडकेत क्रूजर चालकासह सात

कागल प्रतिनिधी ( राजेंद्र पाटील वंदूरकर );कागल मुरगुड राज्यमार्गावर कंटेनर व क्रुझर यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत क्रूजर चालकासह सात एम आय डी सी कामगार जखमी झाले. अपघातात क्रुझर गाडीचे मोठे नुकसान झाले आहे .कंटेनर क्रमांक आर जे १९जी एफ ३२५९ असा तर क्रूजर गाडी क्रमांक एम एच १४ एक्स ६२२३ असा आहे . कंटेनर चालकाचे नाव अशोक कुमार मांगीलाल असे असून ट्रक मालक राजस्थान मधील असल्याचे समजते.
घटनास्थळावरून अपघाताबाबत समजलेली माहिती अशी क्रूजर गाडी कागल कडे एमआयडीसी कामगारांना घेऊन जात होती. तर कंटेनर मुरगुकडे गारगोटी येथे खडी भरून घेऊन जाण्यासाठी जात होता. कागल मुरगूड राज्यमार्गावर बामणी जवळ वळणावर एका गाडीला कंटेनर ओव्हरटेक करत होता. त्यावेळी समोरून क्रूजर गाडी आली. कंटेनर चालकाने डावीकडे वळण घेतले .मात्र क्रुझरने कंटेनरच्या डिझेल टाकीला धडक दिली.त्यामुळे टाकी तुटून पडली. त्यानंतर कंटेनर बाजूच्या ऊसाच्या शेतात घुसला. तर क्रुझर गाडीचे समोरील बाजूस मोठे नुकसान झाले .कंटेनर बाजूच्या शेताऐवजी समोर सरळ गेला असता तर क्रूजर गाडीतील सर्वांच्या जीवावर बेतून भीषण अपघात झाला असता. या सर्वांचे दैव बलवत्तर म्हणूनच किरकोळ जखमींवर निभावले. या अपघातस्थळी बस्तवडे येथे दोन वर्षांपूर्वी झालेल्या भीषण अपघाताच्या आठवणी नागरिकांनी जागृत केल्या. आज असलेल्या अमावस्या मुळे आदमापुर येथे बाळूमामा देवस्थान जाणाऱ्या प्रवाशांच्या गाड्यांची वर्दळ या मार्गावर मोठ्या प्रमाणात होते अपघातानंतर वाहने थांबल्यामुळे मोठी रांग लागली होती. पोलिसांनी अपघातात ग्रस्त गाडी बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
या अपघातात जखमी झालेल्यांची नांवे अशी रामचंद्र आबा सिरसे गाडी मालक व चालक वय ४२ रा.सावर्डे संजय शंकर पाटील वय ४० सावर्डे रामचंद्र खतकर वय ४० रा भडगाव विठ्ठल हरी माने वय ५० रा सावर्डे हरी खतकर वय ३७ रा भडगाव मारुती पाटील वय ४५ रा मळगे रघुनाथ पाटील वय ४० रा केनवडे विठ्ठल हरी माने वय ५० रा सावर्डे अशी आहेत .जखमींवर कागल येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत .कागल पोलिस अधिक तपास करीत आहेत .
चौकट
किरकोळ बचतीसाठी जीवघेणा प्रवास
बस्तवडे येथे दोन वर्षापूर्वी एमआयडीसी कामगारांची वाहतूक करणाऱ्या खाजगी गाडीला झालेल्या भीषणअपघातानंतर राज्य परिवहन महामंडळाने एमआयडीसी कामगारांसाठी गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या आहेत .मात्र तरीही अद्याप काही कामगार खाजगी वाहनातून अवैधरित्या जीवघेणा प्रवास करीत आहेत.आजच्या अपघातानंतर तो कसा जीवघेणा ठरू शकतो हे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.त्यामुळे त्यांनी किरकोळ पैशाच्या बचतीसाठी जीव धोक्यात घालून प्रवास करू नये.अशी चर्चा घटना स्थळी सुरू होती.
छायाचित्र बामणी येथे क्रुझर व कंटेनर यांच्या धडकेत नुकसानग्रस्त क्रूजर गाडी व उसाच्या शेतात घुसलेला कंटेनर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *