ह्युमन राईट मिरर
Friday, 24 May 2019

टाटा एस गोल्ड साजरा करत आहे आपला पहिला वर्धापनदिन

मुंबई: आपले सर्वाधिक लोकप्रिय छोटे व्यावसायिक वाहन- टाटा एस गोल्ड बाजारात आणून एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल टाटा मोटर्स या भारतातील सर्वांत मोठ्या व्यावसायिक वाहन कंपनीने आज टाटा एस वाहनांच्या व अन्य टाटा एससीव्हींच्या संपूर्ण श्रेणीवर अनेकविध ग्राहककेंद्री ऑफर्स जाहीर केल्या. ग्राहकांचे उत्पन्न वाढवण्यावर तसेच त्यांनी ३१ मार्च २०१९ पर्यंत खरेदी केलेल्या टाटा मोटर्सच्या उत्पादनांसाठी त्यांना मोठी बचत करून देण्यावर या योजनांचा भर आहे. बाजारात आल्यापासून या वाहनाने २ दशलक्षहून अधिक ग्राहकांची पसंती मिळवली आहे. यामुळे बाजारपेठेत ६६ टक्के वाटा प्राप्त करून या ब्रॅण्डने मिनी ट्रक विभागात आघाडीचे स्थान मिळवले आहे.

टाटाच्या स्मॉल कमर्शिअल वाहनांच्या प्रकारांच्या खरेदीवर कंपनी कमी व्याजाच्या योजना तसेच व्यक्तिगत विमा संरक्षण देऊ करत आहे. कमी व्याजदर जोखीम (इंटरेस्ट रेट रिस्क अर्थात आयआरआर) योजनेअंतर्गत ग्राहकांना १.९९ टक्के व्याजदराच्या तीन वर्षे चालणाऱ्या ईएमआयवर तसेच २.९९ टक्के व्याजदराच्या चार वर्षे चालणाऱ्या ईएमआयवर १ लाख रुपयांपर्यंत व्याज वाचवता येईल. ही योजना एस एचटी, एस गोल्ड, एस एक्सएल, एस हाय डेक, मेगा कॅब चॅसिस, मेगा, मेगा एक्सएल, झिप गोल्ड आणि झिप एक्सएल या वाहनांवर लागू आहे. याशिवाय, टाटा डिलाइट योजनेखाली कंपनी १० लाख रुपयांचे व्यक्तिगत विमा संरक्षणही पुरवेल. हे लाभ देशभरातील १२२४ डीलर आउटलेट्समध्ये (३एस आणि १एस) उपलब्ध असतील.

टाटा मोटर्सच्या सीव्हीबीयू मार्केटिंग व विक्री विभागाचे उपाध्यक्ष श्री. आर. टी. वासन म्हणाले, “टाटा मोटर्समध्ये आम्ही कायमच ग्राहककेंद्री लाभ देण्यावर व वाहतूक व्यावसायिकांचे उत्पन्न वाढवण्यावर भर देत आलो आहोत. ‘कामयाबी कल, आज और कल’ या आमच्या ब्रॅण्डच्या विषयवस्तूला जागत, टाटा एस गोल्डने या विभागाचा कायापलट करण्याचा वायदा खरा करून दाखवला आहे. श्रेष्ठ दर्जाची सुरक्षितता, सुलभ देखभाल, आरामदायीपणा व किफायतशीरपणा याबाबत ग्राहकांसाठी उत्तम कामगिरी या वाहनांनी करून दाखवली आहे. टाटा एस गोल्ड हे सर्वाधिक विक्री झालेले उत्पादन ठरले आहे. टाटा एस या ब्रॅण्डच्या एकंदर विक्रीमध्ये आजच्या तारखेपर्यंत या वाहनाचा वाटा ६४ टक्के आहे. यामुळे या ब्रॅण्डची लोकप्रियता भारतीय ग्राहकांमध्ये वाढत आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ”

एस गोल्डचे पहिले यशस्वी वर्ष साजरे करण्यासाठी टाटा मोटर्सने विविध मार्केटिंग अभियानांचे आयोजन केले आहे. मुद्रित माध्यमे, रेडिओ व डिजिटल माध्यमांद्वारे प्रमोशन्ससह कंपनीने ग्राहक भेटी, नाका कनेक्ट कार्यक्रम, प्रमोशन थीमसह वाहनाचे प्रात्यक्षिक, कर्ज व एक्स्चेंज मेळावे आणि आकर्षक ग्राहक मेळावे यांचे आयोजन सध्याच्या व संभाव्य ग्राहकांशी जोडून घेण्यासाठी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *