महास्वच्छता अभियान ही लोकचळवळ -उपमहापौर भुपाल शेटे

कोल्हापूर :- महास्वच्छता अभियान ही स्वच्छतेची सर्वात मोठी लोकचळवऴच आहे, असे प्रतिपादन उपमहापौर भूपाल शेट्टे यांनी आज येथे बोलतांना केले.भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या रिजनल आउटरीच ब्युरो व महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाच्यावतीने येथिल एस.एम. लोहीया हायस्कुलमध्ये आयोजित केलेल्याजनजागृती अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अमरीशसिंह घाटगे, न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाऴे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी विकास तापकीर, उपशिक्षणाधिकारी आर.व्ही. कांबळे, गव्हर्नर कौन्सिल न्यू एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव पी.आर.हेरवाडे, मुख्याध्यापक सुर्यकांत चव्हाण, आदि मान्यवर उपस्थित होते.
उपमहापौर भूपाल शेट्टे पुढे बोलताना ते म्हणाले, महास्वच्छता अभियान हा उपक्रम कौतुकास्पद असुन स्वच्छ भारत अभियानामध्ये लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी उपयुक्त ठरेल, या महास्वच्छता अभियानांतर्गत राज्यात 29 शहरामध्ये 2900 महास्वच्छता रैलीचे आयोजन म्हणजे ही स्वच्छतेची मोठी चळवऴ शासनाने उभी केली आहे.
यावेळी बोलतांना जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अमरिशसिंह घाटगे म्हणाले की, सामाजिक स्वच्छता ही आपली सामुहीक जबाबदारी समजून कार्य केले तर महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील भारत ख-या अर्थाने निर्माण होईल व त्यामुळे प्रत्येकाला आरोग्यपूर्ण जीवन जगात येईल असे त्यांनी सांगतिले.
तत्पूर्वी महास्वच्छता अभियानांतर्गत विद्यार्थी व उपस्थित मान्यवर यांनी एस.एम.लोहीया हायस्कुलच्या परिसरामध्ये स्वच्छता करुन स्वच्छता अभियान राबविले. महास्वच्छता रॅलीचे व मुख्य कार्यक्राचे उद्धाटन जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समितीचे सभापती अमरिशसिंह घाटगे, उपमहापौर भूपाल शेटे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थांनी रॅलीमध्ये बहुसंख्येने सहभाग घेऊऩ स्वच्छतेच्या घोषणा दिल्या. रॅलीमधील सहभागी विद्यार्थ्यांनी नागरिकांकडुन स्वच्छतेवर प्रतिक्रिया घेऊन त्यांना स्वच्छतेची शपथ दिली. या कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली व किमान आठवड्यातून स्वच्छतेसाठी दोन तास देऊन या अभियानात सहभागी होण्याचे आश्वासन दिले. शिवसंभा वाघ्या, मुरुळी संस्था, कोल्हापूर यांनी स्वच्छतेवर मंनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
या दोन दिवसीय महास्वच्छता अभियानांतर्गत कोल्हापूर फिल्ड आउटरीच ब्युरो विभागाच्या वतीने कोल्हापूर, सांगली व इचलकरंजी शहरामधील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक मिळुण एकुण 300 शाळेमध्ये दिनांक 11 जानेवारी 2018 रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर, इचलकरंजी व सांगली शहरातील 50 हजारापेक्षा जास्त विद्यार्थांनी सहभाग नोंदविला. यातील काही निवडक चित्रांचे राज्यस्तरीय प्रदर्शन पुणे येथे आयोजित करण्यात येणार असुन मान्यवरांचे हस्ते चांगल्या चित्रांना गौरविण्यात येणार असल्याचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी विकास तापकीर यांनी सांगितले. या महास्वच्छता अभियानाचा कोल्हापूर शहराबरोबरच इचलकरंजी शहराचा सरस्वती हायस्कुल, आणि सांगली शहराचा सांगली हायस्कुल येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुर्यकांत चव्हाण यांनी केले तर सागर बगाडे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक एम.बी.वाघमारे, आर.आर.पवार, आर.जी. देशपांडे, ए.एम.जाधव, नामदेव नाळे, सागर पोवार व विलास शेणवी यांनी परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *