विद्यार्थ्यांनी आजन्म शिक्षण घेत राहिले पाहिजे-नवोदिता घाटगे

कागल:प्रतिनिधी : शालेय जीवनात विद्यार्थ्यांची मेहनत महत्वाची असते.त्यांना शिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन मिळत असते.ते विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजे.याचबरोबर विद्यार्थ्यांनी आजन्म शिक्षण घेत राहिले पाहिजे असे प्रतिपादन जिजाऊ महिला संघटनेच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे यांनी केले.
श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल व ज्युनि.कॉलेजमध्ये गुणवंतांचा सत्कार प्रसंगी त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजमाता जिजाऊ महिला समितीच्या अध्यक्षा श्रीमंत सुहासिनीदेवी घाटगे उपस्थित होत्या.
यावेळी सौ.घाटगे पुढे म्हणाल्या,विद्यार्थ्यांनी ज्ञान घेण्यासाठी सतत वाचन करत करून ज्ञानात भर घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे.अभ्यास हा ताणतणाव न मानता खेळ समजून खेळला पाहिजे तरच यश मिळते.मुलांनी चित्रपट बघताना चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात.त्यांनी जीवनात चांगली वाट निवडून आयुष्य उज्जवल करावे.त्यासाठी सतत धडपड करत रहावी.असा मौलिक सल्लाही सौ.नवोदिता घाटगे त्यांनी दिला.
यावेळी अजितसिंह घाटगे,जितेंद्र चव्हाण,टी ए कांबळे,टी जी आवटे,भिकाजी रेळेकर, सचिन मगदूम, आर के पाटील,कर्नल दिलीपसिंह मंडलिक, कर्नल एम व्ही वेस्वीकर,मुख्याद्यापक एस डी खोत,मुख्याद्यापिका जे व्ही चव्हाण,
शिक्षक,विद्यार्थी,पालक व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याद्यापक एस डी खोत यांनी केले तर आभार सौ.एस बी सासमिले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!