विद्यार्थी हेच खरे ‘स्वच्छतादूत’ आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी

कोरडा कचरा *घरात साठवा शाळेत पाठवा* या उपक्रमास शिक्षकांचा हातभार
कोल्हापूर महानगरपालिका मार्फत शहरातील 16 शाळांमध्ये कोरडा प्लॅस्टिक कचरा घरात साठवा शाळेत पाठवा हा उपक्रम चालू आहे. या उपक्रमाच्या पहिल्याच महिन्यात अंदाजे 250 किलो कोरडा प्लॅस्टिक कचरा सहभागी शाळांमधून गोळा करणेत आला.
आज दिनांक 29 जुलै, 2019 रोजी मनपा यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर येथे सदर उपक्रमाअंतर्गत कोरडा प्लॅस्टिक कचरा साठविणेसाठी कंटेनर हस्तांतरण सोहळा आयुक्त डॉ. मल्लिनाथ कल्लशेट्टी यांचे उपस्थितीत पार पडला. यावेळी क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, मुख्याध्यापक सुनील गणबावले, मनोहर सरगर, स्वच्छ भारत अभियानाचे निलेश पोतदार, आरोग्य निरीक्षक अरविंद कांबळे हे उपस्थित होते.
मनोहर सरगर , मुख्याध्यापक वद्वारकानाथ भोसले , शिक्षक यांचे मार्फत 16 शाळांमध्ये प्लॅस्टिक कचरा साठविण्यासाठी प्रति शाळा 9 कंटेनर देण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश पोवार तर आभार मुख्याध्यापक सुनील गणबावले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *