ह्युमन राईट मिरर
Monday, 22 Apr 2019

राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील दुचाकी वाहनांचा जाहीर लिलाव

कोल्हापूर,दि. 7 : निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क,भरारी पथक कोल्हापूर यांच्या कार्यालयातील दुचाकी वाहनांचा लिलाव दिनांक 22 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 11 वाजता होणार असल्याची माहिती निरीक्षक एस.एस.बरगे यांनी दिली. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क,भरारी पथक कोल्हापूर यांच्या कार्यालयातील मुंबई दारूबंदी कायदा 1949 च्या अंतर्गत गुन्ह्यातील जप्त केलेल्या वाहनांचा व इतर जप्त मुद्देमालाचा (बॅरेल,बाटल्या इ.) लिलाव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क,रंकाळा टॉवर,कोल्हापूर या कार्यालयाच्या आवारात दिनांक 22 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. लिलाव होणारी वाहने कार्यालयाच्या आवारात पहावयास मिळतील तरी इच्छूकांनी संपर्क साधावा.लिलाव होणारी दुचाकी वाहने सुझुकी मॅक्स MH-11-Q-4838,स्पेंडर MH-09-AA-4685, ॲक्टीवा MH-09-AJ-9746, यामाहा क्रुस MH-09-AK-5509, बजाज स्पिरीट MH-09-E-8072,बजाज स्कुटर MH-09-G-5196, बजाज एम-80 MJM-1846, बजाज स्कुटर MH-09-W-820, बजाज स्कुटर MH-09-2398, बजाज एम-80 MH- 09-N-6605, बजाज स्कुटर MH-09-R-7755, बजाज स्कुटर MH-09-M-6730, बजाज स्कुटर MH-09-X-4279,बजाज स्कुटर MH-09-AB-6147, बजाज स्कुटर MH-09-W-8520 अशा 15 वाहनांचा लिलाव होणार आहे. वरील वाहनांपैकी कोणत्याही वाहनांच्या मालकीबाबत कोणाचे हितसंबंध असल्यास संबंधितांनी वाहनाच्या मुळ कागदपत्रासह अधीक्षक राज्य उत्पादन कार्यालयाशी 7 दिवसांत संपर्क साधावा,असे आवाहनही श्री. बरगे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *