राज्याच्या विकासात कृषि विभागाचा मोलाचा वाटा -कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत

कोल्हापूर दि. 12 :- राज्य शासनाने शेती आणि शेतकऱ्यांच्या हितास सर्वोच्च प्राधान्य दिले असून राज्याच्या विकासात कृषि विभागाचा मोलाचा वाटा आहे, असे गौरवोदगार कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज येथे बोलतांना काढले.
येथील पोलीस परेड ग्राऊंडवर आयोजित केलेल्या तरंग राज्यस्तरीय कृषि कला-क्रिडा महोत्सवाचा शुभारंभ कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आला, त्याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. यावेळी कृषी आयुक्त सचिन्द्र प्रतापसिंह, निविष्ठा व गुणनियंत्रणचे संचालक विजयकुमार इंगळे, राष्ट्रकुल कुस्ती सुवर्णपदक विजेते राम सारंग व भारतीय कबड्डी संघाचे तुषार पाटील यांच्यासह कृषि विभागातील वरिष्ट अधिकारी उपस्थित होते.
कृषि विभाग कृषि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्ं हित जोपासत असल्याने सांगून कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले की, कृषि विभागांतर्गत कार्यरत कर्मचारी कल्याण निधीसाठी शासन सकात्मक असून अधिकारी-कर्मचाऱ्याच्या अडीअडचणी आणि प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविले जातील. कृषि क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात कृषिकर्मचाऱ्यांची महत्वपूर्ण भूमीका असल्याचेही ते म्हणाले.
तरंग राज्यस्तरीय कृषि कला-क्रिडा महोत्सवाच्या माध्यमातून कृषिविभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कला-गुणांना निश्चितपणे वाव मिळणार असून यापुढील काळात कृषि विभागातील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून खेळाडू कर्मचाऱ्यांचा गौरव करण्याचा मानस असल्याचेही कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या तात्काळ निराकरणासाठी कृषि विभाग सज्ज आणि सजग असल्याचेही ते म्हणाले.
कृषी आयुक्त सचिन्द्र प्रतापसिंह यावेळी बोलतांना म्हणाले की, कृषि विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मातीशी असलेलं नातं अधिक जिद्द आणि कष्टाव्दारे भक्कम करावे. याव्दारे शासन शेतकऱ्यांसाठी राबवित असलेल्या योजना आणि उपक्रम अधिक प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात सक्रीया व्हावे, असे आवाहनही केले. या स्पर्धेतील सहभागी अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी कोल्हापूर विभागीय कृषि सहसंचालक दशरथ तांबाळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, राज्याचे कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्यातून तरंग राज्यस्तरीय कृषि कला-क्रिडा महोत्सव 13 जानेवारी 2019 पर्यंत आयोजित करण्यात आला असून यामध्ये राज्यातील सर्व 34 जिल्ह्यांमधील तसेच कृषि आयुक्तालय स्तरावरील 1397 पुरुष खेळाडू तर 393 महिला खेळाडू असे 1790 पुरूष व महिला खेळाडू सहभागी झाले आहेत. या महोत्सवामध्ये 12 खेळ प्रकारांचा समावेश असून यामध्ये क्रिकेट, हॉलिबॉल, खो-खो, कबड्डी, 4 x 100 रिले, गोळाफेक, धावणे, लांबउडी, टेबल टेनिस, बुध्दिबळ, बॅडमिाटन आदि खेळ प्रकारांचा समावेश आहे.
याप्रसंगी कृषि संचालक विजयकुमार इंगळे, कृषिसंचालक प्रल्हाद पोकळे, राष्ट्रकुल कुस्ती सुवर्णपदक विजेते राम सारंग व राष्ट्रीय कबड्डी खेळाडू तुषार पाटील आदि मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करुन खेळाडू अधिकारी-कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी सर्व खेळाडूंनी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना संचलनाव्दारे मानवंदना दिली. यावेळी कोल्हापूर जिल्हयाच्या रांगडया शेतकरी कला आणि क्रीडा क्षेत्राला साजेशा संचलनाबरोबरच यवतमाळ, गडचिरोली आणि रत्नागिरीच्या सांस्कृतिक संनलनाने उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमात राष्ट्रीय पातळीवरील विविध क्रीडा प्रकारात निवड झालेल्या कृषि विभागातील खेळाडूंचा तसेच त्यांच्या पाल्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखणीय कामगिरीबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास आत्माचे संचालक अनिल बनसोडे, मृदसंधारण संचालक डॉ. के.पी.माते, निवृतत कृषि संचालक मुधकर घाग, तसेच राज्यातील विभागीय कृषि सहसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी उपस्थित होते. कृषि पर्यवेक्षक संघटनेचे अध्यक्ष अतुल जाधव, कृषि सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष संतोष पाटील यांच्यासह विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. या महोत्सवासाठी तमदलगे येथील 108 शेतकरी समुहाच्या संजीवनी ॲग्रो प्रोडयूसर कंपनीने 400 डझन केली खेळाडूंना उपलब्ध करुन दिली.
शेवटी विभागीय अधिक्षक कृषि अधिकारी उमेश पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. सुरुवातीला कला व क्रिडा महोत्सवात सहभागी पथकांचे संचलनाने पाहुण्यांचा मानवंदना देण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *