स्टार गोल्ड तर्फे अजय देवगणचा 50 वा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा

मुंबई,2 एप्रिल 2019 : बॉलीवूड चित्रपटांचा आघाडीचे चॅनेल असलेल्या स्टार गोल्डने सुपरस्टार अजय देवगणचा 50 वा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा केला.
जुहूच्या एका प्रसिध्द चित्रपटगृहाच्या आवारात अजय देवगणचे तब्बल 25 फुटी पोस्टर बसविण्यात आले आहे. फिल्मी दुनियेतील लार्जर दॅन लाईफ या संकल्पनेला साजेसे असे हे पोस्टर बाजीराव सिंघम या अजय देवगणने साकारलेल्या व्यक्तीरेखेवर आधारित आहे.याचे अनावरण स्वत: अजय देवगण यांच्या हस्ते झाले.ही सर्जनशील कला पाहून स्वत: अजय देवगण यांना आश्चर्य वाटले. याप्रसंगी 50 व्या वाढदिवसानिमित्त चॅनेल तर्फे एक विशेष कलाकृती देखील भेट देण्यात आली.अजय देवगणच्या बरेचशा चाहत्यांसाठी त्याला पाहण्याची आणि त्याला भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची एक अद्वितीय संधी होती. आपल्या वाढदिवसानिमित्त मिळालेली ही विशेष भेट पाहून भावुक झालेला अजय देवगण म्हणाला की, स्टार गोल्ड कडून मिळालेली ही भेट अविस्मरणीय आहे.आतापर्यंत या चॅनेलवर माझे अनेक चित्रपट दाखविण्यात आले आहेत,त्यामुळे मी स्वत:ला त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य मानतो. अजय देवगणच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त "अजय देवगण बर्थडे स्पेशल' शोकेस द्वारे चॅनेलवर संपूर्ण दिवस अजय देवगणचे शिवाय,गोलमाल 3,अॅक्शन जॅक्सन,रेड,गोलमाल अगेन आणि गंगाजल असे निवडक लोकप्रिय चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *