श्री भगवान महावीर मानव सेवा उपचार केंद्राच्या अल्पदरातील रुग्णसेवांचा लाभ घ्या – चेतन ओसवाल

कोल्हापूर, ता. 21 – येथील श्री भगवान महावीर मानव सेवा उपचार केंद्राच्या वतीने देण्यात येणाऱ्या अल्पदरातील विविध रुग्णसेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन चार्टर्ड अकौंटंट चेतन ओसवाल यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
ते म्हणाले, सम्राटनगर येथील जिव्हेश्वर हॉलजवळ 2004 साली गुरूमहाराजांच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या या दवाखान्यामध्ये फक्त तीस रुपयांमध्ये उपचार केले जातात. श्री वर्धमान जैन सेवा संघ ट्रस्टने 15 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या दवाखान्याचा अंदाजे सहा लाखांच्या वर रुग्णांनी लाभ घेतला आहे. सकाळी 9.30 ते 1.30 व सायंकाळी 5.30 ते रात्री 8.30 या वेळेत सुरू असणाऱ्या या दवाखान्यामध्ये डोळे तपासणी, कान-नाक-घसा तपासणी, मधुमेह, उच्च रक्तदाब तपासणी, हृदयविकार, मूळव्याध, अक्युप्रेशर, गुडघे रोपण, कॅन्सर आदी शिबिरे झाली. त्याचबरोबर ओपीडी व अत्याधुनिक फिजोओथेरपी, आर्येवेदिक पंचकर्म, होमॅओपॅथी सेंटर, दंत विभाग, योगा सेंटर व रक्त-लघवी तपासणी लॅब सुरू आहे. रुग्णांसाठी ईसीजी सेवा उपलब्ध आहे. फक्त गरीबच नाही तर सर्व स्तरातील रुग्णांनी येथे येऊन आपल्या आजारावर माफक दरात उपचार करून घ्यावेत. वेळोवेळी आयोजित विविध शिबिरांच्या माध्यमातून मानांकित अशा डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. येथील सर्व उपचार माफक दरात केले जातात, असे आवाहनही श्री. ओसवाल यांनी यावेळी केले.
त्यांनी सांगितले, निवासी डॉक्टरांमध्ये निलेश शहा, अपर्णा जामकर, अपर्णा तिवडे, सयाजी घाटगे, पल्लवी गुंदेशा, भावना जैन, विशाल धापटे, दत्तात्रय निकम तसेच विविध रुग्णांवर उपचार करण्यासाठी अक्षय बाफना, प्रियदर्शिनी जैन, उमेश जैन, अमित पोरवाल, राकेश ओसवाल, ज्ञानेश चिखले, ज्योती ओसवाल आदी डॉक्टर आठवड्यातून एक दिवस येथे येऊन आपली निष्काम सेवा देतात.

मानवसेवा हाच धर्म मानून या दवाखान्यामध्ये डॉ. अशोक शहा, संजय शहा, किरण पोरवाल, प्रकाश कांगटाणी, रतन सुराणा, रमेश जैन, चंदू ओसवाल, चेतन ओसवाल, अजित गुंदेशा, बादल पोरवाल, नितीन ओसवाल आदी पदाधिकारी दवाखान्याचे कामकाज पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *