विशेष कॅम्पमध्ये एका दिवसात विकासकामांच्या 187 फाईल्स् मंजूर

कोल्हापूर / प्रतिनिधी :- सन 2018-19 या मागील वर्षातील प्रलंबित विकासकामांच्या 187 फाईल्स् विशेष कॅम्पमध्ये मंजूर करण्यात आल्या. स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी मंगळवार दि. 11 जून 2019 रोजी महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात या विशेष कॅम्पचे आयोजन केले होते.
गेल्या स्थायी समिती सभेमध्ये अनेक सदस्यांनी मागील आर्थिक वर्षातील विकासकामांच्या फाईल्स प्रलंबित असल्याने प्रभागात विकासकामे प्रलंबित असलेचे निदर्शनास आणून दिले होते. त्याबाबत वारंवार चर्चा होत असलेने या विशेष कॅम्पचे आयोजन स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी करणेचे आदेश प्रशासनाला दिले होते.
यावेळी प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम, पाणी पुरवठा व ड्रेनेज, विदयुत विभागाकडील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला. या प्रलंबित फाईलवर तात्काळ निर्णय घेणेबाबत स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी सुचना केल्या. त्यानुसार शहर अभियंता, मुख्य लेखापाल, मुख्य लेखापरिक्षक यांनी सदरच्या फाईल्स् क्लीअर केल्या. सदरच्या फाईल्स्वर निर्णय झालेने विकासकामांच्या वर्कऑर्डर निघणे, निविदा प्रसिध्द करणेचा मार्ग मोकळा झाला आहे.
यावेळी उपमहापौर भुपाल शेटे, प्राथमिक शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, गटनेता सत्यजित कदम, विजय सुर्यवंशी, नगरसेवक संदीप कवाळे, संजय मोहिते, सुभाष बुचडे, राहूल चव्हाण, महेश सावंत, शेखर कुसाळे, ईʉार परमार, नगरसेविका सौ.स्वाती यवलुजे, सौ.माधुरी लाड, सौ.उमा बनछोडे, सौ.सविता भालकर, सौ.पुजा नाईकनवरे, सौ.छाया पोवार, सौ.उमा इंगळे, सौ.भाग्यश्री शेटके, सौ.कविता माने, सौ.ललिता बारामते, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, मधुकर रामाणे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, मुख्य लेखापरिक्षक धनंजय आंधळे, जल अभियंता सुरेश कुलकर्णी, उपशहर अभियंता रमेश मस्कर, एस.के.माने, आर.के.जाधव, हर्षजीत घाटगे व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!