सोनी सबवर लवकरच येत आहे ‘बावले उतावले: एक विस्फोटक प्रेमकथा’

सोनी सब पुन्हा एकदा ‘डायरेक्टर्स कट’ बॅनरअंतर्गत आणखी एक नवीन मालिका ‘बावले उतावले- एक विस्फोटक प्रेमकथा’ सादर करत आहे. या मालिकेमध्ये एका छोट्या शहरातील दोन जिज्ञासू प्रौढ व्यक्तींचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या मालिकेतील युवांचे एकच ध्येय आहे, आपले प्रेम शोधणे आणि त्याच्यासोबत विवाह करणे. ‘बावले उतावले’ ही गुड्डू व फंटीची कथा आहे. हे दोघेही आपल्या जोडीदाराला भेटण्यास आणि त्याला आपला सहचर बनवण्यास उत्सुक आहेत. योगायोगाने दोघंही त्यांच्या भाऊ व वहिनीच्या मधुचंद्राच्या रात्री बेडरूममध्ये पहिल्यांदा एकमेकांना भेटतात आणि प्रेमात पडतात.
रत्नेश ऊर्फ गुड्डूची भूमिका साकारणारा पारस अरोरा म्हणाला, ”मालिका ‘बावले उतावले’ ही मी यापूर्वी केलेल्या इतर सर्व मालिकांपेक्षा खूपच वेगळी आहे. मी या मालिकेसाठी उत्सुक आहेच, तितकाच नर्व्हस देखील आहे. पण मी सर्व कलाकारांसोबत शूटिंगचा आनंद घेत आहे. मी आशा करतो की, प्रेक्षक देखील या मालिकेचा आनंद घेतील. माझ्या सर्व चाहत्यांनी मी केलेल्या सर्व मालिकांसाठी त्यांचे प्रेम व पाठिंबा दाखवला आहे. मी आशा करतो की, ‘बावले उतावले’ला देखील ते तितकेच प्रेम देतील.”
कुसुम ऊर्फ फंटीची भूमिका साकारणारी शिवानी बदोनी म्हणाली, ”ही माझी पहिली मालिका आहे आणि म्हणूनच माझा आनंद द्विगुणित झाला आहे. आम्ही ‘बावले उतावले’साठी अथक मेहनत घेत आहोत. मी आशा करते की, आम्ही घेतलेल्या मेहनतीइतकेच प्रेक्षक या मालिकेचा आनंद घेतील. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की ही मालिका पहा आणि आमच्यासोबतच मजेशीर क्षणांचा आनंद घ्या.”