‘सिक्स एलिमेंट्स’ गृप – शो कला प्रदर्शना’ची सांगता!

एम.एफ. हुस्सेन यांच्या कलाकृतींवर जिवापाड प्रेम करणारे आणि ‘श्वास’ या ऑस्करपर्यंत धडकलेल्या मराठी चित्रपटासोबतच सुपरहिट ‘क्रिश’ चित्रपटाला आर्थिक पुरवठा करणारे चित्रपट निर्माते ब्रँड गुरु स्वरूव श्रीवास्तव यांच्या प्रमुख उपस्थितीत एलिमेंट्स कला प्रदर्शना’ची सांगता करण्यात आली. आपली उपजत कला स्वतःचा गृहसंसार सांभाळून हॉबी म्हणून जोपासणाऱ्या कलावंत कांचन महंते, पूजा आनंद, निमिषा भन्साळी, स्वाती राखोंडे, विशाखा ठक्कर या गृहिणींच्या कलाकृतींचे ‘गृप पेंटिंग्ज कला प्रदर्शन’ नेहरू सेंटर येथील कलादालनात भरवण्यात आले होते. प्रसिद्ध उद्योजक गुरु स्वरूप श्रीवास्तव यांची उपस्थिती हे एक प्रमुख आकर्षण या प्रदर्शनासाठी विशेष होते. गेली पंचवीसहून अधिक वर्षे विज्ञानधिष्टीत वेगवेगळ्या पेंटींगची खरेदी करणारे ते सर्वात मोठे रसिक असून, भारतीय कलाक्षेत्रात त्यांची विशेष ओळख आहे. भारतीय कलावंतांच्या पेंटींगची सर्वाधिक विक्रमी किंमतींत खरेदी करणारे ते एकमेव रसिक आहेत. आपला घरसंसार सांभाळून सुंदर कलाविष्काराद्वारे विश्वशांतीचा संदेश देणारी आकर्षक पेंटिंग्ज पाहून ह्या पाचही कलावंतांमध्ये दैवी कलागुण असल्याचे उद्गार ब्रँड गुरु स्वरूव श्रीवास्तव यांनी याप्रसंगी काढले.

दिनांक ९ ते १५ एप्रिल दरम्यान नेहरू सेंटर, वरळी येथे संपन्न झालेल्या या प्रदर्शन सोहळयाला कलारसिकांनी सुरुवातीपासूनच विशेष गर्दी करून उदंड प्रतिसाद दिला होता. ‘स्वरूप उद्योग समूहा’च्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कला प्रदर्शनातून जगासमोर पाच महिला कलावंतांनी तयार केलेल्या पेंटींग्जद्वारे ‘विश्वशांतीचा’ संदेश देण्यात आला होता. गुरुजींनी आम्हा नवोदित कलावंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सर्वतोपरी मदत करून हे प्रदर्शन संस्मरणीय केले. तसेच या प्रदर्शनाच्या ‘सांगता सोहळ्या’साठी उपस्थित राहून आमचा हुरूप वाढवला आहे. त्यांनी भारतातील कलावंतांच्या पेंटिंग्जची सर्वाधिक विक्रमी रक्कमेत, कॉर्पोरेट पद्दतीने खरेदी करून ‘भारतीय कलेची’ आणि कलावंतांची खरी पारख करणारे ते जोहरी ठरले आहेत असे उदगार या महिला कलावंतांनी काढले. गुरु स्वरूव श्रीवास्तव हे विज्ञानतज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, उद्योजक व जाणकार कलातज्ञ असल्याने त्यांची प्रतिक्रिया या पाचही कलावंतांसाठी विशेष होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *