शिवाजी विद्यापीठामध्ये मोडी लिपी अभ्यास कार्यशाळेचे आयोजन

कोल्हापूर, दि.14 फेब्रुवारी – शिवाजी विद्यापीठाच्या छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र, इतिहास अधिविभाग यांच्यामार्फत मोडी लिपी अभ्यास कार्यशाळा दिनांक 21 ते 28 फेब्रवारी 2019 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. शिवपूर्वकाळापासून ते स्वातंँयकाळापर्यंत प्रशासनाची तसेच दैनंदिन कामकाजासाठी मराठी भाषे बरोबरच मोडी लिपी मुख्य लिपी असल्याने या काळाबाबतचा इतिहास अभ्यासण्यासाठी ही लिपी ज्ञात असल्याशिवाय संशोधन होऊच शकत नाही. तसेच या काळातील कोणत्याही प्रशासकीय नोंदीकरीताही ही लिपी ज्ञात असणे अपरिहार्य आहे.
समकालीन सामाजिक शास्त्राच्या विद्यार्थ्यापुढे नोकरीच्या संधीचा अभाव ही मोठी समस्या आहे. मात्र या विद्यार्थ्याकडे एखादे कौशल्य असेल तर ते या समस्येवर सहजपणे मात करू शकतील. आज आपणस 1960 पूर्वीच्या शेतीसंबंधीच्या नोंदी, जन्म-मृृत्यू नोंदी, खरेदी पत्रे तसेच या काळातील न्यायालयीन दावे यासंबंधीची सर्व कागदपत्रे ही मोडी लिपीतच उपलब्ध आहेत. मोडी लिपीचे ज्ञान असणारी व्यक्ती अशा कागदपत्रांचे लिप्यंतर करून देऊन समाजास आपले योगदान आपल्या उपजिविकेचा प्रश्न ही सोडवू शकते. याबरोबरच मोडी लिपी ज्ञानाच सर्वाधिक फायदा ही इतिहास व तत्सम सामाजिक शास्त्रांमध्ये संशोधन करू इच्छिणाऽया संशोधक विद्यार्थ्यांना होणार आहे. शिवपूर्व काळापासून इंग्रजी सत्तेच्या कालखंडातील महाराष्टभ व बृृहन्महाराष्टभाबाबत कोणत्याही विषयावर संशोधन करावयाचे असेल तर मोडी लिपीचे ज्ञान असल्याशिवाय पर्याय नाही.
ही काळाची गरज लक्षात घेवून ही अभ्यास कार्यशाळा मा. मच्छिंद्र चौधरी, मोडी पंडीत, डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, कोल्हापूर व समन्वयक डॉ. नीलांबरी जगताप छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र, इतिहास अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सदर कार्यशाळेसाठी प्रवेश विनामूल्य असून विद्यार्थी विद्यार्थीनी, संशोधक, इतिहास अभ्यासक, इतिहास प्रेमी, यांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन केंद्राच्या समन्व्यक डॉ. नीलाबरी जगताप यांनी केंले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!