कानडेवाडी च्या शिवशक्ती दूध संस्थेस आय.एस.ओ प्रमाणपत्र प्रदान

कोल्हाापूरः कानडेवाडी तालुका,गडहिंग्लज येथील शिवशक्ती दूध संस्थेने आय.एस.ओ ९००१:२०१५ मानांकन प्रमाणमञ गोकुळचे चेअरमन मा.श्री.रविंद्र आपटे साहेब यांच्या हस्ते संस्थेचे चेअरमन श्री.रामराज कुपेकर-देसाई व सदस्य दिलीपराव देसाई यांनी स्वीकारले.
शिवशक्ती दूध संस्था १९८४ साली स्थापन झाली असून, या संस्थेने टी.यु.व्ही कंपनीने मानांकना करीता घालून दिलेल्या नियमांचे पालन करून दैनंदिन कामकाजामध्ये बदल करून गोकुळ दूध संघाने राबविलेल्या सर्व योजना दुध उत्पादक सभासदां पर्यंत पोचविल्या आहेत तसेच या संस्थेस लेखापरीक्षणा करीता सतत ‘अ’ वर्ग मिळालेला असून, संपूर्ण व्यवहार हा कॅशलेश पद्धतीने केला जातो. त्यामुळे या संस्थेस आय.एस.ओ मानांकन मिळाले.
यावेळी गोकुळचे चेअरमन मा.श्री.रविंद्र आपटे यांचे हस्ते प्रमाणपञ स्वीकारताना गोकुळचे संचालक व शिवशक्ती दूध संस्थेचे चेअरमन मा. रामराज कुपेकर-देसाई, सदस्य दिलीपराव देसाई, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक श्री.अरुण नरके, विश्वास पाटील (आबाजी), रणजितसिंह पाटील,विश्वास जाधव,बाळासाहेब खाडे,पी.डी.धुंदरे,बाबा देसाई व शिवशक्ती दूध संस्थेचे संचालक मंडळ व दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!