शिवसेना पूरग्रस्तांचे कुटुंब सावरणार : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर /प्रतिनिधी
गेले आठ दिवस महापुराच्या विळख्यात अडकलेल्या आणि अस्मानी संकटाचा सामना करणाऱ्या कोल्हापूर शहरासह जिल्ह्याची सुटका होऊ लागली आहे. कोल्हापूर सह सांगली, शिरोळ आदी भागात पावसाने हाहाकार उडवून दिला. पुराचे पाणी नागरी वस्तीमध्ये घुसले. या लोकांना सतर्क करून मदतकार्य आणि बचावकार्य करण्याचे काम शिवसेना व युवासेनेच्या टीमने केले आहे. शहरात ओढावलेल्या या महाप्रलयाने शुक्रवार पेठ, जुना बुधवार पेठ, हरिओम नगर, नंदनवन पार्क, रमणमळा, मुक्तसैनिक वसाहत, जाधववाडी, बापटकॅम्प, कदमवाडी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, रमणमळा, कसबा बावडा आदी परिसरातील नागरिकांवर संकट ओढावलेले आहे.     
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यावर कोसळलेल्या अस्मानी संकटातुन बाहेर पडण्यासाठी हजारो मदतीचे हात सरसावले असुन, शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरेसाहेब व शिवसेना नेते युवासेना अध्यक्ष मा.आदित्यजी ठाकरेसाहेब यांच्या आदेशाने शिवसेनेकडुन भरघोस मदतीचा ओघ सुरु झाली आहे. शहरात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावतीने शिवसेना पुरग्रस्त सहाय्यता केंद्र,दसरा चौक येथील सी.के.पी. बोर्डिंग येथे सुरु करण्यात आले आहे.या केंद्रातुन शहरातील पुरग्रस्त भागात मदत पोहोच केली जाणार आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तु,अन्नधान्य,कपडे,चादर आदि स्वरुपात हि मदत केली जाणार आहे.
आज या मदत वाटपाकरिता चार वेगवेगळ्या टीम द्वारे १२ टेम्पोतून ही भरघोस मदत पहिल्या टप्प्यात शिवसेनेच्या वतीने शहरातील विविध भागात करण्यात आली आहे. शिवसेना संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, देवस्थान समितीच्या कोषाध्याक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या उपस्थितीत आज हि मदत दसरा चौक येथील शिवसहाय्य मदत केद्रातून रवाना करण्यात आली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नियोजनाखाली शिवसेना पदाधिकारी यांनी लाईन बझार, कसबा बावडा आदी पूरग्रस्त भागात, देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर यांच्यासह शिवसेना महिला आघाडीने बापट कॅम्प, कदमवाडी, जाधववाडी, मुक्त सैनिक वसाहत, या भागात, युवानेते ऋतुराज क्षीरसागर यांच्यासह युवा सेनेच्या पदाधिकारी यांनी शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, कोंडाओळ, रिलायन्स मॉल या भागात, तर युवानेते पुष्कराज क्षीरसागर यांच्यासह युवा सेनेच्या पदाधिकारी यांनी जुना बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, पंचगंगा तालीम, मस्कुती तलाव या भागात पूरग्रस्त नागरिकाना मदतीचे वाटप केले. यामध्ये सोलापुरी चादर, साड्या, चुडीदार, शर्ट- पॅन्ट, गाऊन, बिक्सिट पुडे, चिवडा, पाण्याच्या बाटल्या आदी जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली.
या मदत कार्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तांदूळ, पीठ, कडधान्य, तेल, आदी जेवणाच्या साहित्यासह रोजच्या गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. यासह पुरामुळे घरांचे नुकसान झालेल्या प्रत्तेक कुटुंबास शासनाकडून मदत मिळवून देण्याची आणि पुरामुळे बाधित झालेल्या प्रत्तेक रुग्णाची वैद्यकीय जबाबदारी शिवसेना उचलेल, अशी ग्वाही दिली.
या पूरग्रस्त भागातील नागरिकांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह त्यांच्या सोबत मदत कार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी हि आमची मदत नसून पूरग्रस्तांना पुन्हा नव्याने उभारी देण्याची शिवसेनेची जबाबदारी असल्याचे सांगत. पूरग्रस्त नागरिकांना सर्वतोपरी मदत करणार असून त्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहणार असल्याचे सांगितले.
या चारही टीममध्ये किशोर घाटगे, दीपक गौड, रमेश खाडे, तुकाराम साळोखे, सुनील जाधव, अमर समर्थ, सुजित देशपांडे, अजित गायकवाड, सुनील खोत, राहुल चव्हाण, रघुनाथ टिपुगडे, अंकुश निपाणीकर, निवास राऊत, रणजीत जाधव, राजू पाटील, अमित चव्हाण, सनी अतिग्रे, अश्विन शेळके, विक्रम पवार, निलेश गायकवाड, गजानन भुर्के, भीमराव बिरंजे, राजू काझी, सुरेश कदम, राकेश पवार, शाम जाधव, बंडा माने, अमर क्षीरसागर, शैलेश कुंभार, विनय वाणी, रणजीत सासणे, मुन्ना तोरस्कर, राज अर्जुनिकर, युवासेनेचे अविनाश कामते, पियुष चव्हाण, कपिल सरनाईक, ओमकार परमणे, शिवतेज सावंत, मुकुंद मोकाशी, अमोल बुद्ढे, श्रीकांत मंडलिक, हर्षवर्धन पाटील, विनायक सासने, अल्लाउद्दीन नाकाडे, राहुल माळी, संजय बावडेकर, सुनील बावडेकर, राजू साळोखे, प्रशांत नलवडे, सचिन  पाटील, मुकेश हुजरे, प्रवीण गुहागरकर, राजू शहा, शिवसेना महिला आघाडीच्या सौ. मंगल साळोखे, सौ. पूजा भोर, सौ. शाहीन काझी, सौ. अनुराधा परमणे यांच्यासह शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *