शितोळे सरकारांच्या माऊलीं अश्वांचा अंकली ते आळंदी प्रवास सुरु

अंकली /प्रतिनिधी
अंकली ता. चिक्कोडी येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींचा अश्व मोती व जरी पटक्याचा अश्व हिरा अशा या मानाच्या अश्वांच्या अंकली ते आळंदी अशा 300 किमी प्रवासास सुरवात करण्यात आली. तर
रिंगण सोहळ्याचे आकर्षण असलेले माऊलींचे अश्व 300 किमीचा प्रवास करून तेथून पुढे आळंदी ते पंढरपूर या प्रवासास निघणार आहेत. 187 वर्षाची शितोळे घराण्याची परंपरा व माऊलीची सेवा करण्यास सज्ज झाले असून नियोजन बध्द हा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहीती श्रीमंत उर्जितसिंहराजे शितोळे सरकार यांनी दिली.
अंकलीकर शितोळे सरकार यांच्या वाड्यात सकाळी 9 वाजता अंबाबाई मंदिरात पूजन व आरती करण्यात आली. जरीपटक्याचे पूजन करण्यात आले. दोन्ही अश्वांचे श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार व महादजी राजे शितोळे सरकार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. दिंडी व दोन्ही अश्व राजवाड्याबाहेर येताच भाविकांनी पाणी घालून ओवाळणी केली व दर्शन घेतले. गावातील पारंपारीक मार्गावरून ही मिरवणूक वेशीत आल्यानंतर अश्वांना निरोप देण्यात आला. याप्रसंगी आळंदीहून दिंडीचे मालक बाळासाहेब आरफळकर पवार, माऊली गुळूंजकर, सत्यवान बवले, संजय बवले, अजित मधवे, तर कोथरूड पुणे येथून शंकर मोकाटे, विजय मोकाटे, सचिन तिकोणे, राजाभाऊ थोरात, मोरेश्वर गायकवाड, अतूल नाझरे, यांच्यासह बसवप्रसाद जोल्ले, शिवराज जोल्ले, अश्वथ शितोळे सरकार, तुकाराम पाटील, संजय चौॆधरी, विवेक कमते, यांच्यासह अंकली, जुगूळ, चंदूर, मांजरीवाडी, काडापूर, परीसरातील वारकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!