शाहू समाधी स्थळाचे काम 31 जुलै पुर्वी पुर्ण करण्याचे महापौरांचे आदेश

कोल्हापूर/प्रतिनिधी : शाहू समाधी स्थळाचे काम 31 जुलै पुर्वी पुर्ण करावे असे आदेश महापौर सौ.सरीत मोरे यांनी राजर्षी शाहू समाधी स्थळ विकास समितीच्या बैठकीत दिले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समधी स्थळाच्या कामाचा आढावा महापौर सौ.सरीता मोरे यांनी छ.ताराराणी सभागृहात आढावा बैठक घेऊन घेतला. या बैठकीला आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह पदाधिकारी आणि समाधी स्थळ विकास समितीचे सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत महापौर आणि आयुक्तांनी समाधी स्थळ कामाचा आढावा ठेकेदार व्ही के पाटील यांच्याकडून घेतला. यानंतर आयुक्त डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी म्हणाले ठेकेदार यांनी 20 जून 2019 पर्यंत कंपौडचे काम पुर्ण करावे. त्यांनी तयार केलेला बारचार्ट मला सादर करावा. मी स्वत: कामाच्या ठिकाणी अधूनमधून पाहणी करणार आहे. 15 दिवसांनी पुन्हा समितीची बैठक घेऊ असे सांगितले. ठेकेदार व्ही. के. पाटील यांनी समाधी स्थळी स्टोनचे, पेव्हींगचे व लॅन्डस्केपिंगचे काम एकाच वेळी सुरु करण्यात आले आहे. ज्याकामासाठी चार महिन्याचा कालावधी लागणार आहे ते काम दोन महिन्यात पुर्ण करणेच्या दृष्टीने बारचार्ट तयार केला आहे. कंपौंडसाठी लेबरची संख्या वाढवण्यात आलेली आहे. ते काम पुर्ण होणेसाठी 10 ते 12 दिवसाचा कालावधी लागेल. लाईटींगचे व इतर प्रलंबीत कामे पुर्ण करण्यासाठी 31 जुलै पर्यंत कालावधी लागणार आहे.
उपशहर अभियंता एस.के.माने यांनी बोलताना ठेकेदाराची कामे प्रगतीपथावर आहे. कंपौडचे काम 8 ते10 दिवसात पुर्ण होणार असून डेकोरेटिव्ह डिझाईनचे कामासाठी वेळ लागणार आहे. गेट, ग्रील फिटींग व कलर कामासाठी 8 दिवस लागणार आहे. पाथवेच्या फौंडेशनचे काम सुरु आहे. 15 दिवसात राफ्टचे काम पुर्ण होईल. पाथवेसाठी आवश्यक ती दगडी फरशी तयार आहे. त्यानंतर इलेक्ट्रीकची कामे होणार आहेत.
समिती सदस्य वसंतराव मुळीक यांनी बोलताना महापालिकेने या कामासाठी 70 लाख निधी उपलब्ध करुन त्याबद्दल आभार व्यक्त करुन काम पुर्ण झाल्यानंतर लोकार्पण सोहळा आयोजित करावा असे सांगितले. प्रशासनाकडून काम चांगल्या दर्जाचे व प्रगतीपथावर असलेचे त्यांनी सांगितले. समाधी स्थळाच्या ठिकाणी कोणीही गैरवर्तन केलेचे निर्देशनास आलेस सिध्दार्थमधील नागरीक त्याचा बंदोबस्त करतील. फक्त विनाकारण गैजसमज पसरवले जावू नयेत असे वसंत लिंगनुरकर यांनी सांगितले.
या बैठकीत महापौर सौ.सरीता मोरे यांनी 31 जुलै पुर्वी सर्व कामे पुर्ण करावीत असे आदेश संबंधीत अधिकारी व ठेकेदार यांना दिले. काम पुर्ण झाल्यानंतर भव्यदिव्य असा लोकार्पण सोहळा घेऊन या स्मारकाचे उद्घाटन करण्यात येईल असेही महापौर सौ.सरीता मोरे यांनी सांगितले. यावेळी उपमहापौर भूपाल शेटे, परिवहन समिती सभापती अभिजीत चव्हाण, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, सभागृहनेता दिलीप पोवार, प्रभाग समिती सभापती सौ.हसीना फरास, नगसेविका सौ.मेहेजबिन सुभेदार, पुरा अभिलेख विभागाचे गणेश खोडके, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!