शाहू मॅरेथॉन तर्फे दुसऱ्या टप्प्यातील वृक्षा रोपण मोहिम संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी
पश्चिम महाराष्ट्राला मॅरेथॉन किडा प्रकारची ओळख करून देणाऱ्या आणि सलग चोवीस वर्ष या स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या बिनखांबी गणेश मंदिर परिसरातील शाहू मॅरेथॉन समूहातर्फे या पावसाळ्यात शहरातील विविध भागात पूर्ण वाढ झालेली पाचशेहून अधिक रोपे शास्रशुध्दपणे लावण्यात करण्यात येणार आहे , आज त्याचा दुसरा टप्पा सानेगुरुजी वसाहत येथे पार पडला .शाहू जयंतीदिनी या मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात आयटीआय मैदान परिसरात एकशे दहा झाडे लावण्यात आली होती . आज सानेगुरुजी वसाहत परिसरातील राजू पाध्ये नगर या परिसरात चार फूट मोठ्या उंचीच्या साठ झाडाचे रोपण करण्यात आले . ही झाडे या परिसरातील प्रशाला येना दत्तक स्वरुपात देण्यात आली आहे आयटीआय येथे झालेल्या वृक्षारोपण सोहळ्यात प्राचार्य रवींद्र मुंडासे उपप्राचार्य कुठे दत्तात्रय पाठक एम एस सातव एनएसएस प्राध्यापक के.आर.अंबी , भंडारप्रमुख प्रतापसिंह घोरपडे , आर बी पाटील आदी उपस्थित होते. आज आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला सानेगुरुजी वसाहत – राजे ऊपाध्ये नगरमघ्ये स्थानिक नगरसेविका मनिषा कुंभार आणि स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अध्यक्ष किसन बापू भोसले , द्वारकानाथ नायडू , संदीप जाधव , मदन पाटील ,संपत बापू जाधव, चंद्रकांत झुरळे , राजेंद्र मकोटे , दिलीप काटे ,तुषार भिवटे ,आदी मान्यवरांच्या उपस्थित ही मोहीम पार पडली . येत्या आँगस्ट अखेर शहरातील गरजेच्या जागेवर ही वृक्षारोपण मोहीम शास्त्रशुद्धपणे राबवली जाणार असून त्यासाठी स्थानिक मंडळे कार्यकर्ते व महिला बचतगट यांनी सदर वृक्ष संगोपन करण्याच्या अटीवर बिंखांबी गणेश मंदिर बिनखांबी जवळ शाहू मॅरेथॉन कार्यात संपर्क साधावा अशी प्रांजल साद किसन बापू भोसले तसेच चंद्रकांत झुरळे यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने केली आहे. आज झालेल्या वृक्षारोपण मोहिमेत दुर्मिळ व आदिशक्ती महालक्ष्मी देवीच्या हाथी आसणारे म्हाळुंग फळाचे झाडासह कडुलिंब , जांभुळ , आवळा आदि ऊपयुक्त पक्षी पुरक झाडे लावण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!