कलम 370 रद्द झाल्याने जम्मू-काश्मीर राष्ट्रीय प्रवाहात : भाजपा प्रवक्ते माधव भंडारी

कोल्हापूर : एका देशात दोन पंतप्रधान, दोन घटना आणि दोन राष्ट्रध्वज मुळीच चालणार नाहीत, ही राष्ट्रीय ऐक्याची भूमिका घेऊन जनसंघा पासून भारतीय जनता पक्षा पर्यत आणि संस्थापक शामाप्रकाश मुखर्जी पासून विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यापर्यत प्रदीर्घ काळ, राजकारणा पलिकडे जाऊन, प्रंसगी प्रतिकुल झळ सोसत भारतीय जनता पार्टीने अखेर 370 कलम रद्द करत खऱ्या अर्थाने जम्मू-काश्मीर ला राष्ट्रीय प्रवाहात आणले आहे ” असे मत भाजपा प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने लकी बाजार सभागृहात आयोजित याविषयी व्याख्यानात त्यांनी आपले सविस्तर विवेचन केले.

याप्रसंगी बोलताना माधवजी भंडारी म्हणाले, देश स्वातंत्र्यानंतर एकेकाळी काश्मीर मध्ये जाण्यासाठी व्हिसा प्रमाणे अन्य भारतीयांना परमिट घ्यावे लागत होते यासाठी तेव्हाच्या जनसंघाने मोठे जन आंदोलन उभे केले आणि संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांना एकवीस दिवस काश्मीरच्या तुरुंगात अटकेत राहावे लागले त्यावेळी तत्कालीन काश्मीरचे मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी जाणीवपूर्वक त्यांची नियमित औषधे न देता व त्यांना पुरेशा वैद्यकीय सेवा ही वेळेवर न दिल्यानेच अखेर त्यांचा तुंरुगांतच मृत्यू झाला. त्याःना वैघकीय ऊपचार मिळावेत या साठी त्यावेळी त्यांचे स्वीय साहाय्यक असणारे माननीय अटल बिहारी वाजपेयी यांनी यासाठी काश्मीर चे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यापर्यंत सगळे प्रयत्नाची पराकाष्टा पत्रव्यवहार करूनही किमान वैद्यकीय मिळालीच नाही आणि तुरुगांतच अखेर त्यांची हत्या झाली असे खेद पूर्वक नमूद करत त्यांच्या बलिदानाची परिपूर्ती लोकशाही मार्गाने पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी घटनेच्या चौकटीत राहून आणि संसदीय प्रणालीत सर्व खासदारांना पुरेपूर बोलण्याची संधी देऊन मतदानाने हे 370 कलम रद्द करत भारतीय जनता पक्षाने रद्द आहे असे त्यांनी नमूद केले. ” देश स्वांतत्र झालेवर असणारी 632 संस्थाने विलीन करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभाई पटेल यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती मात्र आपल्या विशेष अधिकारात एक संस्थानाचा अर्थात काश्मीरच्या विलिनीकरणाची अधिकार पंडित नेहरू यांनी आपल्याकडे घेतला आणि त्यामुळेच ही समस्या निर्माण झाली . काश्मीरला झुकते माप देणारे 370 वे कलम हेसुद्धा तत्कालीन घटना समितीपुढे न आणता एकतर्फी लादले गेले होते अशी माहिती त्यांनी यावेळी देत, संसदेच्या दोन्ही सभागृहात ३७० कलमावर बोलू इच्छिणाऱ्या प्रत्येक खासदार सदस्यास पुरेपूर वेळ बोलून दिल्यानंतरच ते रद्द करण्यासाठी मतदान घेण्यात आले आणि विशेष म्हणजे भाजपाच्या एनडीए घटक पक्ष बसपा आणि अन्न सदस्यांनीही त्यास पुरक मतदान केल्याचे आणि हीच आणि हीच तमाम भारतीयांची इच्छा असल्याचेही भंडारे यांनी आग्रहाने नमूद केले . तसेच भौगोलिकदृष्ट्या विचार करून जम्मू, काश्मीर आणि लडाख अशा तीन प्रांतांची नवीन रचना केली. वर्षानुवर्षे ३७० कलम रद्द करा म्हणणारे आज ३७० कलम का रद्द केले असे विचारून समाजात दुही पेरण्याचे काम करत आहेत. तरी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बूथ स्तरापर्यंत जावून या ऐतहासिहक निर्णयाची माहिती जनसामान्य नागरिकांपर्यंत पोचवावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!