सांगलीच्या कृष्णा नदीच्या प्रदूषणमुक्तीला सुरवात

सांगली (शरद गाडे )- आज दि ८/२/२०१९रोजी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका २१वा वर्धापन दिन यांचे अवचित्य साधून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या असणाऱ्या सांगलीच्या कृष्णा नदीच्या प्रदूषणमुक्तीला आजपासून सुरवात करण्यात आली आहे.
येणाऱ्या अडीच वर्षात सांगलीची कृष्णा नदी प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे. या प्रदूषणमुक्त कृष्णा नदीच्या महत्वकांक्षी प्रकल्पास कृष्णा नदीची स्वच्छता करीत सुरवात करण्यात आली आहे.
या वेळी सन्मा सदस्य श्री , शेखर इनामदार यांनी कृष्णा नदीच्या महत्वकांक्षी प्रकल्प आणि कृष्णा नदीची स्वच्छता या बाबत सर्वांना महत्व पटवून देऊन येणाऱ्या काळात कृष्णा नदीच्या महत्वकांक्षी प्रकल्पास कृष्णा नदीची स्वच्छता करणे बाबत नियोजन पूर्वक काम करणे आवश्यक आहे त्या कामी म न पा वतीने कसे काम करण्यात येणार आहे हे सांगण्यात आले , मा महापौर सो यांनी देखील कृष्णा नदीच्या महत्वकांक्षी प्रकल्पास कृष्णा नदीची स्वच्छता बाबत सर्वांना माहिती या वेळी दिली आहे ,
या स्वच्छता मोहिमेत मा , महापौर संगीता खोत उप महापौर धीरज सूर्यवंशी , स्थायी समिती सभापती अजिक्य पाटील प्र स १सभापती सौ बेलवलकर यांच्यासह नगरसेवक संजय कुलकर्णी , सुब्राव मद्रासी महिला नगरसेवकांनी नदी पात्रात उतरून अन्य कचरा गोळा केला.
या मोहिमेत महापालिकेचे सर्व पदाधिकारी तसेच कर्मचारी आणि अधिकारी यांनीही सहभाग घेत कृष्णा प्रदूषणमुक्त अभियानाची सुरवात केली आहे.
या मोहिमेत एक टन कचरा आणि निर्माल्य यावेळी कृष्णा नदीच्या पात्रातून काढण्यात आले आहे.
यासाठी महापालिकेने येणाऱ्या बजेट मध्ये कृष्णा प्रदूषण मुक्त अभियानासाठी भरीव निधी धरला असून पुढील अडीच वर्षात सर्व नदी पात्र प्रदूषणमुक्त करण्याचा मानस महापौरांनी व्यक्त केला आहे.
कृष्णा नदी प्रदूषण मुक्तीसाठी सर्व नगरसेवक उद्यापासून कृष्णा नदीच्या पुलावर निर्माल्य नदीत टाकणाऱ्याना गांधीगिरी पद्धतीने फुले देऊन प्रबोधनाची मोहीम हाती घेऊन जनतेला नदी पात्रात निर्माल्य न टाकनेचे आवाहनही करणार आहेत ,
या वेळी उप आयुक्त सौ मौसमी चौगुले बर्डे सह सहा आयुक्त घोरपडे , सिस्टीम मॅनेजर जकाते जन संपर्क अधिकारी डी व्ही हर्षद , आरोग्य अधिकारी सुनील आबोळे , डॉ सुरवशी अग्निशमन अधिकारी देसाई , चिंतामणी कांबळे सह विविध विभाग प्रमुख , कर्मचारी उपस्थितीत होते
दर मंगळवारी होणारी सदरची स्वछतामोहीम या पुढे या ठिकाणी देखील राबविण्यात येणार आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *