ह्युमन राईट मिरर
Monday, 22 Apr 2019

सांगलीच्या कृष्णा नदीच्या प्रदूषणमुक्तीला चांगला प्रतिसाद

सांगली (संतोष कुरणे) – पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या असणाऱ्या सांगलीच्या कृष्णा नदीच्या प्रदूषणमुक्तीला दि ८/2/2019 ,पासून सुरवात करण्यात आली आहे. येणाऱ्या अडीच वर्षात सांगलीची कृष्णा नदी प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे. या प्रदूषणमुक्त कृष्णा नदीच्या महत्वकांक्षी प्रकल्पास कृष्णा नदीची स्वच्छता करीत सुरवात करण्यात आली आहे.
या वेळी सन्मा सदस्य श्री , शेखर इनामदार यांचे मार्गदर्शन आणि मा महापौरसो सगीता खोत मा आयुक्त श्री रवींद्र खेबुडकर याचे नेतृत्वाखाली कृष्णा नदीच्या महत्वकांक्षी प्रकल्प आणि कृष्णा नदीची स्वच्छता या बाबत सर्वांना महत्व पटवून देऊन येणाऱ्या काळात कृष्णा नदीच्या महत्वकांक्षी प्रकल्पास कृष्णा नदीची स्वच्छता करणे बाबत नियोजन पूर्वक काम करण्यात आले आहे त्या कामी म न पा वतीने चांगले काम करण्यात येत आहे ,
या स्वच्छता मोहिमेत अति आयुक्त मौसमी चौगले बर्डे सह सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते , पाणी पुरवठा अधीक्षक काका हलवाई , जन संपर्क अधिकारी हर्षद , डॉ सुरवशी सह आरोग्य विभाग , अन्य विभागाचे कर्मचारी अधिकारी यांनी नदी पात्रात उतरून अन्य कचरा गोळा केला.
या मोहिमेत एक अर्ध्या टन कचरा आणि निर्माल्य यावेळी कृष्णा नदीच्या पात्रातून काढण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *