सानेगुरुजी येथे पतंजली योग प्राणायाम योग शिबिर उत्साहात

कोल्हापूर,: कोल्हापूरातील सानेगुरुजी येथील वीर सावरकर हॉल येथे पतंजली योग प्राणायम मोफत पाच दिवसीय शिबीर उत्साहात पार पडले.प्रास्ताविक/स्वागत
संदीप पाटील यांनी केले.या
शिबीरात परिसरातील ६० हून अधिक महिला, पुरूषांनी सहभाग घेतला. तर योगतज्ञ अरुण बेळगावकर यांनी शिबिरामध्ये मार्गदर्शन केले. शिबिरात योगासनांसह आहार -विहार, योग्य दिनचर्या, प्रत्येक आजारांवरील मार्गदर्शन आसने, ध्यानधारणा, सूर्यनमस्कार, हास्यासन आदींचे मार्गदर्शन केले.
गेली २ वर्षे वीर सावरकर हॉल येथे हे योगवर्ग विलासराव निकम यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहेत.राजलक्ष्मी नगरसह पांडुरंगनगरी, सुबल रेसिडेन्सी,सरदार पार्क, बाले किल्ला, पाम ग्रोव्ह येथील नागरीकांनी शिबारात सहभाग नोंदवला. योग शिबीर समारोपाच्या निमित्ताने योगतज्ञ अरुण बेळगावकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास योगशिक्षक मा. विलासराव निकम,जिल्हा प्रभारी मा. चंद्रशेखर खापणे, योगतज्ञा मा. जयश्री नागवेकर, योगशिक्षिका पूनम चोडणकर,अलका शिंदे उपस्थित होते. आभार पूनम चोडणकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *