संध्यामठ महोत्सव तयारी अंतिम टप्यात

कोल्हापूर प्रतिनिधी ( नम्रता गाडे ):- येथील शिवाजी पेठेतील नामवंत मंडळांपैकी एक नामवंत मंडळ म्हणजे संध्यामठ तरुण मंडळ. रंकाळ्याच्या निसर्ग रम्य वातावरणामध्ये प्राचीन काळापासून असलेला संध्यामठ .याच मठाच्या नाववरती युवकांनी तयार केलेले संध्यामठ तरुण मंडळ ज्याचा यावर्षी वर्धापनदिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या वर्धापन दिनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यात अनेक कला,क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. लोकांच्यामध्ये मंडळाविषयी आदर , एकोप्याची भावना नेहमी राहावी यासाठी मंडळाचे सर्व कार्यकर्ते मिळून या सोहळ्याचे आयोजन करतात. या सोहळ्यासाठी होणारा खर्च सर्व कार्यकर्ते स्व: खर्चाने करतात.
हा सोहळा तीन दिवस चालणार असून शुक्रवार दिनांक 17/05/2019 ते रविवार दिनांक 19/05/2019 पर्यंत आहे. या तीनही दिवशी तीन चाकी सायकल स्पर्धा, स्केटिंग स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,लिंबू चमचा स्पर्धा, पोत्यात पाय घालून पळणे, संगीत खुर्ची, भव्य रांगोळी स्पर्धा, होम मिनिस्टर, फॅन्सी ड्रेस,भव्य हलगी, रेकॉर्ड डान्स ,रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबीर व हिप्नॉटीझम या सारखे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.यावेळी मंडळाचे कार्यकर्ते रविराज नलवडे,ओंकार भालकर, योगेश भालकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *