संत निरंकारी फौंडेशनतर्फे पर्यावणदिनानिमित्त पन्हाळ्यावर स्वच्छता मोहीम

पन्हाळा/प्रतिनिधी :- संत निरंकारी फौंडेशनच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ऐतिहासिक पन्हाळगडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशनने निरंकारी सेवादलाच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून ही स्वच्छता मोहीम राबवली. दरम्यान सायकल रॅली, पथनाट्य आणि वृक्षारोपन करून पर्यावरणाचा जागर करण्यात आला.पन्हाळा-शाहुवाडी चे आमदार सत्यजित पाटील म्हणाले सध्या पर्यावरणाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. पुढच्या पिढीचं रक्षण करायचं असेल तर निरंकारी मंडळाने सुरु केलेले पर्यावरण रक्षणाचे काम प्रत्येकाने हाती घेऊन ते निरंतर सुरू ठेवले पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज तीव्र पाणी टंचाई आहे. पर्यावरणाच्या -हासाला कुठेतरी आपण स्वत: जबाबदार आहोत असा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. वेळ अजूनही गेलेली नाही. पण आपण असेच हातावर हात धरून बसलो तर आपल्या हातात एक दिवस काहीह राहणार नाही. त्यामुळे आताच प्रत्येकाने जागे होऊन पर्यावरण रक्षणाचं हे काम वर्षातून एक दिवस नव्हे तर निरंतरपणे सुरू ठेवलं पाहिजे असं आवाहन पाटील यांनी केले .
निरंकारी फौंडेशनने ज्या कामाची सुरुवात पन्हाळ्यावर केली आहे. त्याचा आपण वर्षातले ३६५ दिवस आपआपल्या गावांमध्ये प्रसार केला पाहिजे.पर्यावरण रक्षणाची प्रत्येकाची जबाबदारी आहे, पर्यावरणाच्या -हासामुळे पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येकाला पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने आपआपल्या परीने योगदान दिलं पाहिजे. निरंकारी फाऊंडेशन अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वसामान्य लोकांच्या भाषेत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे. तो संदेश या कानाने ऐकून त्या कानाने सोडून न देता मनात ठेवला पाहिजे आणि त्यानुसार काम केलं पाहिजे, असं आवाहनही सत्यजित पाटील यांनी केले. पोलिस उपाधिक्षक आर.आर. पाटील म्हणाले, निरंकारी फौंडेशन हे फक्त शहरातील कचरा काढून शहर स्वच्छ करत नाही, तर ते मानसांची मन स्वच्छ करण्याचं काम करतं. पर्यावरण रक्षणाचं हे काम असंच निरंतर सुरू राहवं यासाठी सर्वांनी प्रत्न केले पाहिजेत. या कार्यक्रमासाठी फाऊंडेशनने पन्हाळगडाची निवड केली या बद्दल मी या मंडळाचं आभार मानतो. नगराध्यक्ष्या रुपाली धडेल म्हणाल्या, ” पन्हाळ्याच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी पन्हाळा नगरपरिषदेचा सतत प्रयत्न असतो. तरी मिशनने पन्हाळ्याचा पर्यावरण जनजागृती कार्यक्रमासाठी पन्हाळ्याची निवड केली या बद्दल पन्हाळा नगरपरिषद आपली आभारी आहे. स्वच्छ भारत स्पर्धेमध्ये पन्हाळा नगरपरिषदेचा देशात सहावा क्रमांक आला आहे. या पुढील काळातही आम्ही पन्हाळ्याच्या पर्यावरणात आणि सौंदर्यात भर घालण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी आपण फाऊंडेशनने पुन्हा पुन्हा असे कार्यक्रम पन्हाळ्यावर घेऊन जनजागृती करावी.
फौंडेशनच्या वतीने १०० हून अधिक देशी वृक्षाची झाडे पन्हाळ्यावर मान्यवरांच्या हस्ते लावली. या झाडाचे संगोपन करण्याची जबाबदारीही फौंडेशनने घेतली आहे. यंदा देशभरातील १७ पर्वतीय पर्यटनस्थळांवर एकाचवेळी हा कार्यक्रम घेण्यात आला. झाडू, खराटे, घमेली, अशा सर्व साहित्यासह आलेल्या निरंकारी सेवा दलाच्या स्वयंसेवकांनी संत निरंकारी सेवादलाचे पुरुष स्वयंसेवक खाकी वर्दी, तर महिला स्वयंसेवक निळा आणि पांढरा पोषाख परिधान करून या उपक्रमात सहभाग घेतला. पन्हाळ्याचे सर्व प्रमुख रस्ते, तहसिलदार कार्यालयाच्या समोरील तळ्याचा परिसर, पन्हाळ्यावरील बागा या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. त्याच बरोबर स्थानिक नागरिक आणि निरंकारी मंडळाचे भक्तगण या उपक्रमात आपल्या सामान्य पोषाखात सहभागी झाले होते.
निरंकारी चॅरिटेबल फौंडेशनचे शिक्षण विभागाचे मेेबर इनचार्ज सतिश तलवार, पोलिस उपाधिक्षक आर. आर. पाटील, पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा रुपाली धडेल निरंकारी फाऊंडेशनचे क्षेत्रिय प्रभारी, अमरलाल निरंकारी, निरंकारी सेवा दलाचे क्षेत्रिय संचालक शहाजी पाटील, कोल्हापूर मुखी श्रीपती जाधव, एसएनसीएफ मेंबर कोल्हापूर श्याम लालवाणी, अशोक अहुजा, जालंधर जाधव, दत्तात्रय जगताप, अशोक आंब्रे, आनंद उगवे, संतोष सुखवानी, गोपाळराव निरंकारी, संजय नागदेव, पन्हाळा परिसरातील निरंकारी मुखी, गोवा येथील श्रीराम महाले, महादेव नाईक,अशोक नाईक, दशरथ गावित, सांगलीचे क्षेत्रिय संचालक जगन्नाथ निकाळजे आदी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!