सह्याद्री शिलेदारसेवा प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले बनवा स्पर्धांचे आयोजन

महाराष्ट्रातील किल्यांना असा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक खूप मोठा वारसा आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीतही या किल्यांचा वाटा फार मोटा आहे. पण हा इतिहास आजच्या पिढीला कितपत ठाऊक आहे. त्यांच्यापर्यंत हा जाज्वल्य इतिहास कसा पोहचवायचा , यासाठी रविवार पेठ येथील सह्याद्री शिलेदार सेवा प्रतिष्ठान तळमळीनं प्रयन्त करीत आहेत. या वर्षांपासून प्रथमच “किल्ले  बनवा स्पर्धा ते आयोजित करत आहोत त्या साठी मोठे मैदान आणि दगड माती आम्ही पुरवणार आहोत. मुलांमध्ये गडकिल्यांनविषयी आकर्षण निर्माण करण्याचे काम करून त्यांना रोख बक्षिसे देणार आहोत. त्यामध्ये प्रथम क्रमांक-५५५५/-द्वितीय क्रमांक-३३३३/-तृतीय क्रमांक-२२२२/- आणि उत्तेजनार्थ अशी भरघोस बक्षीस आहेत. संशोधक, अभ्यासक, पत्रकारांकडून स्पर्धेचं परीक्षण केलं जाणार आहे. किल्ला तयार करण्यासाठी कोणती सामग्री वापरावी इथपासून तर किल्ल्यांच्या स्वरूपाविषयी मुलांना स्वतः संशोधक व अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत. शिवकालीन किल्ल्यांचे स्वरूप कळावे यासाठी गाद-दुर्गाची माहिती देणारी पुस्तके, नकाशे, व्हिडीओ अशी सगळी सामग्री स्पर्धकांना उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. शिवकालीन किल्ले निर्माण करीत असताना मुलांमध्ये साहजिक शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र समजून घेण्याची आवड निर्माण होते. किल्ल्यांचे हे स्वरूप किल्ले स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांना समजावून सांगण्यासाठी किल्ले बांधणाऱ्या कार्यशाळांचे आयोजन केले आहे. किल्यांसंबंधी विविध पुस्तक व किल्ला उभारणीसाठी जागेची निवड करण्यापासून त्यासाठी कोणते साहित्य वापरावे याचं मार्गदर्शन पुठ्यांचे खोक, शेण, नैसर्गिक रंग,गोणपाट, प्लायवूड, यांसारख्या वस्तू वापर अशा बारीकसारीक गोष्टींबाबत आम्ही मुलांना माहिती देणार आहोतच, या तळमळीमुळे मुलांमध्ये किल्ल्यांविषयी, आपल्या इतिहासाविषयी आवड निर्माण होईल व आणखी पाठबळ मिळेल . सदर  स्पर्धा सुसरबाग बिंदू चौक  इथं होणार असून १४ नोव्हेंबर  रोजी बक्षिस वितरणाचा कार्यक्रम होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!