ह्युमन राईट मिरर
Friday, 24 May 2019

शाहू समाधीस्थळ कामाची महापौरांकडून पाहणी

कोल्हापूर ता.06 :- महापालिकेच्यावतीने सी वॉर्ड सि.स.नं.2948 नर्सरी बाग या जागेत विकसीत करण्यात येत असलेल्या राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाच्या कामाची महापौर सौ. सरीता मोरे यांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यासमवेत पहाणी केली राजर्षी शाहू समाधी स्थळ सिध्दार्थनगर सहभाग कृती समितीच्या वतिने वसंत लिगनूरकर यांनी आपले मागणी बाबत प्रस्ताविक करुन महापौर यांना मागणिचे निवेदन देणेत आले. त्यामध्ये त्यांनी सिध्दार्थनगर नागरिकांना वहिवाटी करीता प्रवेश द्वार असावे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉल व त्यामधील व्यायाम शाळा इतरत्र हलविणेत येऊ नये, समाधी स्थळाचा उल्लेख करताना सिध्दार्थनगर रा.छ.शाहू समाधी स्थळ सिध्दार्थनगर असा उल्लेख करणेत यावा. अशी मागणी केली आहे. यावर मा.महापौर यांनी निवेदनाबाबत पाच नागरीकांची समिती स्थापन करुन मा.आयुक्त यांचे बरोबर चर्चा करुन सकारात्मक मार्ग काढणेचे ठरविणेत आले. त्याची मिटींग दोनच दिवसात लावणेत येईल असे नमुद केले.
उपमहापौर भूपाल शेटे यांनी बोलताना राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाच्या कामाची नोंद जगामध्ये होईल असे नमूद केले.
यावेळी प्राथमिक शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, प्रभाग समिती सभापती सौ.हसिना फरास, नगरसेविका सौ.मेहजबीन सुभेदार, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, अदिल फरास, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता एस के माने, वसंतराव मुळीक, इंद्रजीत सावंत, वास्तुशिल्पी अभिजीत जाधव, ठेकेदार व्ही.के.पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *