रिक्षाचालक जमीर मुल्लाचा प्रामाणिकपणा

कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूरात रिक्षा चालक जमीर रशीद मुल्ला याच्या रिक्षात प्रवासी महिला प्राची मिलिंद मांगलेकर (वय 38 )रा.रणनवरे कॉम्प्लेक्स राजारामपुरी दुसरी गल्ली यांची नजरचुकीने रिक्षात राहिलेली १५हजार रोख रक्कमेसह महत्त्वांच्या कागदपत्रे असणारी बँग रिक्षाचालक जमीर मुल्ला याने प्रामाणिकपणे
शाहूपुरी पोलीस ठाण्यात प्रवासी महिला प्राची मांगलेकर यांच्या कडे सुपूर्द केली. त्यामुळे रिक्षाचालकांने दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल जमीर मुल्ला यांचा शाहूपुरी पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्याकडून सत्कार करण्यात आला.
दिं.30मे रोजी सकाळी प्रवासी महिला प्राची मांगलेकर यांनी 9:50 च्या सुमारास रिक्षाचालक जमीर मुल्ला यांच्या रिक्षात बसून नंदादीप हॉस्पिटल ते मध्यवर्ती बस स्थानक दरम्यान
प्रवास केला. त्यानंतर रिक्षातून उतरल्या असता त्यांची 15 हजार रोख रक्कम व दवाखान्याचे, स्वतःची महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग रिक्षामध्ये नजरचुकीने राहिली होती. ती बॅग कागदपत्रातील पत्त्यावरून रिक्षाचालक जमीर रशीद मुल्ला( वय 40 ), रा. लिशा हॉटेल शेजारी, नम्रता घरकुल यांनी अतिशय प्रामाणिकपणा दाखवून सदर महिलेस शाहूपुरी पोलिस ठाण्यामध्ये बोलावून परत केली.
त्यांच्या प्रामाणिकपणा बद्दल शाहूपुरी पोलिस ठाण्यातर्फे त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पोलिसांसमक्ष त्यांनी सदरची मौल्यवान कागदपत्रे व रोख रक्कम असलेली बॅग प्रवासी महिलेस परत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!