नियमित आहार व व्यायामामुळे उच्च रक्तदाब वर मात करण शक्य : हदयरोगतज्ञ डॉ. उदय मिरजे

कोल्हापूर/प्रतिनिधी : उच्च रक्तदाब असो वा कोणताही आजार. यावर व्यायामासह नियमित आहारा द्वारे नियंत्रण ठेवता येतय.त्यामुळे मनुष्याला निरोगी राहण्यासाठी जीवनात व्यायाम करण महत्त्वाच असून त्याचबरोबर नियमित आहार ही घेण गरजेचं असल्याच हदयरोगतज्ञ डॉ. उदय मिरजे यांनी जागतिक उच्च रक्तदाब दिनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी सवांद साधताना सांगितलं.
आजच्या आधुनिक धावत्या स्पर्धेच्या काळात माणसाला अनेक आजारांना सामोरे जाव लागतंय.तर शहरासह ग्रामीण भागात उच्च रक्तदाबाचे प्रमाणात वाढ होत आहे.उच्च रक्तदाब हा मूक हत्यार असून तो लक्षणांबरोबर किंवा त्याशिवाय येऊ शकतो. ज्यामुळे हदयरोग,मूत्रपिंड रोग,पक्षाघात(स्ट्रोक),डोळे यासारख्या समस्या उद्भवतात.म्हणून च आपल्याला उच्च रक्तदाब पासून कसे दूर ठेवावे माहिती असले पाहिजे.त्यामुळे उच्चरक्तदाबवर नियंत्रण ठेवण्यासाठी
सर्वानी नियमितपणे आपले वर्षातून एकदा ब्लड प्रेशर,शुगर,नंबर,तपासले पाहिजेत.तर रक्तदानही केल पाहिजे.त्याचबरोबर स्वस्थ आहार घ्यावा, भरपूर पाणी प्यावे, दररोज अर्धा तास चालणे,धूम्रपान, व्यवसापासून दूर राहण महत्त्वाचे आहे. त्यामुळे रक्तदाब व हदयरोगावर उपचार करण्यासाठी कोल्हापूरात शरण्या हार्ट केअर सेंटर उपलब्ध आहे.
पत्रकार परिषदेला अभिषेक शर्मा, धर्मेंद्र शर्मा यांच्या सह औषध प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *