रेंज रोव्‍हर वेलारच्‍या स्‍थानिक पातळीवर निर्माणाच्‍या शुभारंभाची घोषणा

मुंबई : जग्‍वार लँड रोव्‍हर इंडियाने आज रेंज रोव्‍हर वेलारच्‍या स्‍थानिक पातळीवर निर्माणाच्‍या शुभारंभाची घोषणा केली. रेंज रोव्‍हर वेलार २.० लिटर पेट्रोल (१८४ केडब्‍ल्‍यू) आणि २.० लिटर डिझेल (१३२ केडब्‍ल्‍यू) पॉवरट्रेन्‍समध्‍ये उपलब्‍ध असेल. रेंज रोव्‍हर वेलारची किंमत ७२.४७ लाख रूपये (एक्‍स-शोरूम इंडिया) आहे.

जग्‍वार लँड रोव्‍हर इंडिया लिमिटेड (जेएलआरआयएल)चे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक रोहित सुरी म्‍हणाले:

”आम्‍ही उच्‍च स्‍पर्धात्‍मक दरांमध्‍ये सर्वोत्‍तम ब्रिटीश डिझाइन, लक्‍झ्युरी आणि तंत्रज्ञान देण्‍यावर फोकस देण्‍याचा प्रयत्‍न करतो. आम्‍हाला विश्‍वास आहे की रेंज रोव्‍हर वेलारचे स्‍थानिक पातळीवरील उत्‍पादन आमच्‍या या प्रयत्‍नांना अधिक योग्‍य दिशा देईल. यामधून भारतीय बाजारपेठ व आमच्‍या ग्राहकांप्रती आमची कटिबद्धता देखील दिसून येते.”

आर-डायनॅमिक एस डेरिएटिव्‍हमध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या आणि स्‍थानिक पातळीवर निर्माण करण्‍यात आलेल्‍या रेंज रोव्‍हर वेलारमध्‍ये गतिशील डिझाइन, तंत्रज्ञान व लक्‍झ्युरी अशी सर्वोत्‍तम वैशिष्‍ट्ये असतील. टचप्रो ड्युओ, अॅक्टिव्‍हीटी की व प्रो सर्विसेस, मेरिडियन साऊंड सिस्‍टम (३८० वॅट), फोर-झोन क्‍लायमेट कंट्रोल, केबिन एअर आयोनायझेशन प्रीमिअम लेदर इंटेरिअर्स, ५०.८ सेमी (२० इंच) व्‍हील्‍ससह पूर्ण आकारातील स्‍पेअर व्हिल, आर-डायनॅमिक एक्‍स्‍टेरिअर पॅक, अॅडप्टिव्‍ह डायनॅमिक्‍स, सिग्‍नेचर एलईडी डीआरएलसह प्रीमिअम एलईडी हेडलाइट्ससह, पार्क असिस्‍ट अशी काही सर्वोत्‍तम वैशिष्‍ट्ये देखील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *